Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भीषण अपघात : समृद्धी महामार्गावर कारला जोरदार धडक, दीड वर्षाचा चिमुकला सुखरूप!

समृद्धी महामार्गावर अपघातांची साखळी सुरूच असून, वाशिम जिल्ह्यात कारंजाजवळ एका कारचा भीषण अपघात झाला आहे. या कार्ल एका अज्ञात वाहनाने दिली. धडकेत

मिरजजवळ काळीज हेलावणारा अपघात! भरधाव कार थेट उभ्या ट्रकमध्ये घुसली; वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू
माणुसकी मेली की काय? सोनभद्रमध्ये ट्रकच्या भीषण अपघातात चालक जळत असताना लोक व्हिडिओ काढण्यात मग्न!
भावनगरमध्ये दारूच्या नशेत कार चालकाचा भीषण धुमाकूळ; ५ हून अधिक जणांना चिरडले
समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, वाशिम जिल्ह्यातील कारंजाजवळ एका कारचा भीषण अपघात झाला आहे.

समृद्धी महामार्गावर अपघातांची साखळी सुरूच असून, वाशिम जिल्ह्यात कारंजाजवळ एका कारचा भीषण अपघात झाला आहे. या कार्ल एका अज्ञात वाहनाने दिली. धडकेत कारमधील पती-पत्नी जखमी झाले असून, सुदैवाने दीड वर्षाचे बाळ या अपघातातून सुखरूप बचावले आहे. हे कुटुंब मुंबईहून अमरावतीच्या दिशेने जातअसताना वेगाने जाणाऱ्या कारला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक १५९ वर हा अपघात घडला आहे. ही धडक इतकी भीषण होती की कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
या अपघातात कार चालक श्याम देशमुख हे गंभीर जखमी झाले आहेत, तर त्यांच्या पत्नी जयश्री देशमुख यांना किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र, या भीषण अपघातात एक दीड वर्षाचे बालकला कोणत्याही इजा न होता पूर्णपणे सुरक्षित राहिले आहे.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस अज्ञात वाहनाचा शोध घेत असून, अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.

COMMENTS