कर्जत : तालुक्यातील कोंभळी येथे यात्रा कमेटी निवडण्यासाठी आयोजित ग्रामसभेतच वाद झाला. त्यावेळी काही जणांनी मध्यस्थी करून वाद मिटवला. मात्र ग्

कर्जत : तालुक्यातील कोंभळी येथे यात्रा कमेटी निवडण्यासाठी आयोजित ग्रामसभेतच वाद झाला. त्यावेळी काही जणांनी मध्यस्थी करून वाद मिटवला. मात्र ग्रामसभा संपल्यानंतर गावातील भैरवनाथ मंदिराच्या परिसरात नारायण बाळासाहेब गांगर्डे, प्रवीण सुरेश गांगर्डे व त्यांना सोडवण्यासाठी गेलेले ग्रामपंचायत सदस्य दीपक गांगर्डे यांना जबर मारहाण करण्यात आली होती.
याप्रकरणी मिरजगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला होता ,मात्र आरोपींवर कोणतेही कारवाई मिरजगाव येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड करत नाही .झालेल्या मारामारी प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करावी, तसेच तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण लोखंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे तसेच शिष्ट मंडळ भेटून केली आहे.
कारवाई तात्काळ न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख बळीराम यादव, उपतालुका प्रमुख व ग्रामपंचायत सदस्य दीपक गांगर्डे, दीपक मांडगे, राहुल गांगर्डे, अक्षय तोरडमल, रोहित तोरडमल, प्रवीण गांगर्डे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यानंतर पत्रकारांना माहिती देताना दीपक गांगर्डे यांनी सांगितले की, गावातील यात्रेच्या संदर्भात कमिटी निवडण्यासाठी ग्रामसभा बोलवण्यात आली होती. त्या ठिकाणी शेखर खरमरे हे माझ्या अंगावर शिवीगाळ करत धावून आले. काही जणांनी मध्यस्थी केली आणि वाद थांबवला मात्र ग्रामसभा संपल्यानंतर भैरवनाथ मंदिराच्या परिसरात नारायण गांगर्डे व प्रवीण गांगर्डे यांना यांना मारहाण करण्यात येत असताना त्या ठिकाणी मी दीपक कुंडलिक गांगर्डे हा भांडणे सोडवण्यासाठी गेलो असताना ,चंद्रशेखर विठ्ठल खरमरे यांनी खाली पाडून हातातील लोखंडी गजाने डोक्यावर मारहाण केली .त्यानंतर प्रवीण आजिनाथ गांगर्डे यांनी पाठीमागून मला पकडले व ज्ञानदेव लक्ष्मण गांगर्डे यांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये दीपक गांगर्डे गंभीरित्या जखमी झाला व त्याला नजर येथे खाजगी रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. या घटनेनंतर मिरजगाव पोलीस स्टेशनमध्ये चंद्रशेखर विठ्ठल खरमरे ज्ञानदेव लक्ष्मण गांगर्डे प्रवीण आजिनाथ गांगर्डे व इतर सहा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी मारहाण आरोपी गावामध्ये उघडपणे फिरत आहेत. यानंतर पुन्हा 10 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता गावातील बस स्टॅन्ड परिसरात ज्ञानदेव गांगर्डे, विठ्ठल गांगर्डे, रूपचंद गांगर्डे व चंद्रशेखर खरमरे यांनी तू जर केस माघारी घेतली नाही तर तुला तुझ्या वडिलांना जसे चौकात मारले होते त्याल प्रमाणे तुला पण जीवे ठार मारून टाकू असे म्हणत शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. यामध्ये मुक्कामार लागला असून आपल्या जीवितस देखील धोका आहे असे दीपक गांगर्डे यांनी सांगितले.
झालेल्या मारामारी प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करावी, तसेच तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करावा, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण लोखंडे यांच्याकडे केली. तसेच तात्काळ अंमलबजावणी न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे. या घटनेमुळे प्रशासनावर तात्काळ कारवाईचा दबाव वाढला असून आरोपींवर लवकरात लवकर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

COMMENTS