https://www.youtube.com/watch?v=iI6p_sZSxHM आयपीएल 2026 मधील 20वा सामना मुंबई इंडियन्स (MI) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात मुंबईच्या
आयपीएल 2026 मधील 20वा सामना मुंबई इंडियन्स (MI) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सायंकाळी 7:30 वाजता रंगणार आहे. भारतीय संघासाठी अनेक सामने जिंकून देणारे कोहली आणि रोहित आज पुन्हा आमनेसामने येणार आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने तब्बल 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. तर विराट कोहलीच्या कर्णधारपदात आरसीबीला एकही ट्रॉफी मिळाली नव्हती. मात्र, मागील हंगामात रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली आरसीबीने पहिल्यांदाच आयपीएल जिंकत इतिहास रचला.
मुंबई आणि बंगळुरू यांच्यात आतापर्यंत 34 सामने झाले आहेत. या सामन्यांमध्ये
मुंबई इंडियन्सने 19 वेळा विजय मिळवला तर
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने 15 वेळा विजय मालवला आहे. आकडेवारीनुसार मुंबईचं पारडं जड आहे, पण यंदा RCB दमदार फॉर्ममध्ये दिसत आहे.
सर्वाधिक चौकारांच्या बाबतीत विराट कोहली आणि रोहित शर्मा बरोबरीत आहेत. मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूर सामन्यात रोहित आणि कोहलीने प्रत्येकी 78 चौकार मारले. षटकारांच्या बाबतीत रोहित आघाडीवर आहे, पण कोहलीही फार मागे नाही. रोहितने आरसीबीविरुद्ध 38 षटकार मारले, तर विराटने एमआयविरुद्ध 34 षटकार मारले.
भारतीय संघासाठी अनेक सामने जिंकून देणारे कोहली आणि रोहित आज पुन्हा आमनेसामने येणार आहेत.

COMMENTS