Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

धक्कादायक : अमेरिका-इराण ‘शांती वार्ता’ फिसकटली; जे.डी. व्हान्स मायदेशी रवाना!

https://www.youtube.com/watch?v=_5qCtzTLcrc संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या आणि गेल्या 21 तासांपासून पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये सुर

इराण अण्वस्त्रे न बनवण्याचे आश्वासन; शांतता करारात अटी आणखी कडक : डोनाल्ड ट्रम्प
इराणचे परराष्ट्र मंत्री येणार भारत दौऱ्यावर; ब्रिक्स परिषदेसाठी १४ आणि १५ मे रोजी दिल्लीत बैठक
अमेरिका-इराण ‘शांती वार्ता’ फिसकटली; जगावर पुन्हा युद्धाचे सावट, जे.डी. व्हान्स मायदेशी रवाना!

संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या आणि गेल्या 21 तासांपासून पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये सुरू असलेल्या अमेरिका आणि इराण यांच्यातील ‘शांती वार्ता’ अखेर निष्फळ ठरली आहे.

‘इराणने आमच्या अटी स्वीकारल्या नाहीत, परिणामी चर्चा निष्फळ ठरली. आम्ही इराणला आमचा सर्वोत्तम प्रस्ताव दिला, परंतु त्यांनी आमच्या कोणत्याही अटी स्वीकारण्यास नकार दिला. आम्ही कोणत्याही निष्कर्षावर पोहोचलो नाही आणि वॉशिंग्टनला परत जात आहोत.’ अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हान्स (JD Vance) यांनी या चर्चेविषयी माहिती देताना सांगितलंय. अशातच हि चर्चा फिस्कटलयच्या घटनेला काही तास उलटत नाही तर अमेरिका पुन्हा एकदा आक्रमक पवित्र्यात आल्याचे दिसून आले आहे.पाकिस्तानमधील चर्चा अयशस्वी झाल्यानंतर अमेरिकेने आता कारवाईला सुरुवात केली आहे. त्यांनी मध्य पूर्वेकडे अनेक विमाने पाठवली आहेत. तर दुसरीकडे, इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये संयुक्त अरब अमिरातीहून सिंगापूरकडे जाणाऱ्या दोन युद्धनौकांना त्रास दिला. इराणी बोटींचा सामना अमेरिकन जहाजांशी झाला. नंतर दोन्ही युद्धनौका अरबी समुद्रात सुखरूप परतल्या. इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची यांनी आयआरजीसीला तात्काळ हल्ला न करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती आहे. तर अमेरिका-इराण चर्चा अयशस्वी झाल्यानंतर, इराणचे नेते पाकिस्तान सोडताच अमेरिका त्यांना लक्ष्य करू शकते, असा दावा रशियन माध्यमांनी केला आहे. त्यामुळे आता शांती वार्ता निष्फळ ठरल्यानंतर पुन्हा एकादा युद्ध भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

जोपर्यंत अमेरिका आणि इराण यांच्यात एक नवीन आणि ठोस करार होत नाही, तोपर्यंत होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्याची शक्यता नाही. याचा परिणाम केवळ या दोन देशांपुरता मर्यादित राहणार नाही, तर जागतिक तेल पुरवठा, व्यापार आणि अर्थव्यवस्थेवरही होईल. जर परिस्थितीत लवकरच सुधारणा झाली नाही, तर हे संकट एका मोठ्या संकटात बदलू शकते.

COMMENTS