Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्ह्यातील धरणांमध्ये 49.11 टक्के पाणी साठा

लातूर प्रतिनिधी - जिल्ह्यात 2 मोठे, 8 मध्यम आणि 132 लघु असे एकूण 142 प्रकल्प आहेत. गतवर्षीच्या चांगल्या पावसामुळे हे सर्वच प्रकल्प तुडूंब भरले ह

तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांची धाडसी कारवाई
सशक्त नौदलाची संकल्पना शिवरायांची
निश्चित ध्येय प्राप्तीसाठी परिश्रमात सातत्य आवश्यक-पोलीस अधीक्षक डॉ.सोमय मुंडे

लातूर प्रतिनिधी – जिल्ह्यात 2 मोठे, 8 मध्यम आणि 132 लघु असे एकूण 142 प्रकल्प आहेत. गतवर्षीच्या चांगल्या पावसामुळे हे सर्वच प्रकल्प तुडूंब भरले होते; परंतू गेल्या महिन्यापासून वाढलेल्या उन्हाच्या तीव्रतेमुळे प्रकल्पांतील पाणी साठा झपाट्याने घटत चालला आहे. जिल्ह्यातील 142 प्रकल्पांमध्ये 49.11 टक्के पाणी साठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील प्रकल्पांतील पाणी साठा 50 टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. उन्हाळ्याचे अद्याप दोन महिने शिल्लक आहेत. वाढत्या उन्हामुळे प्रकल्पांतील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होऊन प्रकल्पांतील पाणी साठा आणखी कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे पाणी काटकसरीने वापरण्याची गरज आहे.
लातूर जिल्हा तसा पर्जन्य छायेखालील प्रदेश म्हणून ओळखला जातो त्यामुळे जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस पडला म्हणजे पुढच्याही वर्षी चांगलाच पाऊस पडेल किंवा यंदा जेमतेम पाऊस पडला म्हणजे पुढच्याही वर्षी जेमतेमच पाऊस पडेल, असेही नाही. दरवर्षी लातूर जिल्ह्यात पावसाचे स्वरुप बदलत असते. जिल्ह्यात गेल्या वर्षी सर्वदूर मोठा पाऊस पडला त्यामुळे लातूर जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या मांजरा, निम्न तेरणा प्रकल्प 100 टक्के भरून वाहिले होते. 8 मध्यम व 132 लघु प्रकल्पही तुडूंब भरले होते. प्रकल्पांत पाणी साठा मुबलक असल्याने यंदा अद्यापपर्यंत पाणीटंचाई जाणवली नाही. जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांत फेबु्रवारीपर्यंत मुबलक पाणी साठा राहिला. मार्चमध्ये उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत गेली. परिणामी प्रकल्पांतील पाण्याच्या बाष्पीभवनाची गती वाढली त्यामुळे प्रकल्पांतील पाणी साठा गतीने कमी होताना आकडेवारीवरून दिसून येत आहे. लातूर शहरासाठी महत्त्वपूर्ण असणा-या मांजरा प्रकल्पात सध्या 113.201 दशलक्ष घनमीटर पाणी साठा आहे. याची टक्केवारी 63.97 एवढी आहे. जिल्ह्यातील निम्न तेरणा हा प्रकल्पही महत्त्वाचा असून यामध्ये 61.725 दशलक्ष घनमीटर पाणी असून याची टक्केवारी 67.67 इतकी आहे. या 2 प्रकल्पांतील एकूण पाणी साठा 65.23 टक्के एवढा आहे. जिल्ह्यात 8 मध्यम प्रकल्प असून या सर्व प्रकल्पांत 56.756 दशलक्ष घनमीटर पाणी साठा आहे. याची टक्केवारी 46.46 इतकी आहे. जिल्ह्यात 134 लघु प्रकल्प आहेत. यात 110.308 दशलक्ष घनमीटर पाणी साठा आहे. याची टक्केवारी 35.10 एवढी आहे.

COMMENTS