Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रांजणगाव-पिंपरी गवळी येथे शिवरस्त्याच्या कामास प्रारंभ

सुपा : पारनेर तालुक्यातील रांजणगाव परिसरातील अनेक वर्षे रखडलेले शिवरस्ते अखेर मोकळे होऊ लागल्याने शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. शासनाने शिवरस्त्यांबाबत तातडीने पावले उचलल्याने शेतमालाच्या वाहतुकीसाठी आवश्यक असलेले मार्ग उपलब्ध होत असून, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. रांजणगाव व पिंपरी गवळी परिसरातील जिव्हाळा बंगला ते खडकवाडी तसेच पिंपरी गवळी ते अस्तगाव या सुमारे दोन किलोमीटर लांबीच्या शिवरस्त्याच्या कामास मंगळवारी (दि. ७) प्रारंभ करण्यात आला. या कामासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत स्वयंप्रेरणेने सहमती दर्शविली. रांजणगावचे विद्यमान सरपंच महेश देशमुख यांच्या प्रयत्नांतून हा मार्ग मोकळा करण्यात आला असून त्यानंतर तातडीने रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी सुपा मंडलाधिकारी सौ. मांडगे यांच्यासह संबंधित अधिकारी, तलाठी व पोलिस कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमास सरपंच महेश देशमुख, उपसरपंच शिवाजी शिंदे, माजी सरपंच शरद सरोदे, बंटी साबळे, बाबा जवक, चेअरमन अनिल जवक, नामदेव जवक, दिलीप जवक, मधुकर जवक, विशाल जवक, बबन जवक, विनोद जवक, लालासाहेब जवक तसेच पिंपरी गवळी येथील नंदाराम मांडगे, कैलास मांडगे, चंदर मांडगे आदींसह शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाघापूरला महिलेवर बिबट्याचा हल्ला
शिर्डीत ‘हिंदू महासंमेलन’ उत्साहातभव्य बाईक रॅली, भारतमाता पालखी सोहळा; विविध मान्यवरांचे मार्गदर्शन
संजीवनी इंजिनिअरिंगच्या नऊ विद्यार्थ्यांना नोकरी

सुपा : पारनेर तालुक्यातील रांजणगाव परिसरातील अनेक वर्षे रखडलेले शिवरस्ते अखेर मोकळे होऊ लागल्याने शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. शासनाने शिवरस्त्यांबाबत तातडीने पावले उचलल्याने शेतमालाच्या वाहतुकीसाठी आवश्यक असलेले मार्ग उपलब्ध होत असून, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

रांजणगाव व पिंपरी गवळी परिसरातील जिव्हाळा बंगला ते खडकवाडी तसेच पिंपरी गवळी ते अस्तगाव या सुमारे दोन किलोमीटर लांबीच्या शिवरस्त्याच्या कामास मंगळवारी (दि. ७) प्रारंभ करण्यात आला. या कामासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत स्वयंप्रेरणेने सहमती दर्शविली.

रांजणगावचे विद्यमान सरपंच महेश देशमुख यांच्या प्रयत्नांतून हा मार्ग मोकळा करण्यात आला असून त्यानंतर तातडीने रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी सुपा मंडलाधिकारी सौ. मांडगे यांच्यासह संबंधित अधिकारी, तलाठी व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमास सरपंच महेश देशमुख, उपसरपंच शिवाजी शिंदे, माजी सरपंच शरद सरोदे, बंटी साबळे, बाबा जवक, चेअरमन अनिल जवक, नामदेव जवक, दिलीप जवक, मधुकर जवक, विशाल जवक, बबन जवक, विनोद जवक, लालासाहेब जवक तसेच पिंपरी गवळी येथील नंदाराम मांडगे, कैलास मांडगे, चंदर मांडगे आदींसह शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS