दिल्ली : गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या रोमांचक सामन्यात अवघ्या 1 धावेने विजय मिळवला, पण षटकांच्या संथ गतीमुळे कर्णधार शुभमन गिलला श

दिल्ली : गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या रोमांचक सामन्यात अवघ्या 1 धावेने विजय मिळवला, पण षटकांच्या संथ गतीमुळे कर्णधार शुभमन गिलला शिक्षा भोगावी लागली. या सामन्यात गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करत 211 धावांची भक्कम धावसंख्या उभारली. दिल्ली कॅपिटल्सने जोरदार झुंज देत 19 षटकांत 6 गडी गमावून 198 धावा केल्या. दिल्लीला शेवटच्या षटकात विजयासाठी 13 धावांची गरज होती आणि सामना पूर्णपणे त्यांच्या बाजूने झुकलेला दिसत होता. मात्र, गुजरातच्या षटकांची गती संथ झाली
यामुळे संघाला फटका बसला. नियमांनुसार, 30-यार्ड सर्कलमध्ये एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक ठेवावा लागला, ज्यामुळे दबाव आणखी वाढला.
आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.22 अंतर्गत शुभमन गिलला 12 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. या हंगामात गुजरातने षटकांच्या संथ गतीच्या नियमाचे उल्लंघन करण्याची ही पहिलीच वेळ होती. दिल्ली कॅपिटल्सच्या डावातील शेवटचे षटक थरारक ठरले.
दिल्ली कॅपिटल्सचा या हंगामातील हा पहिला पराभव होता, तर गुजरात टायटन्सने आपल्या पहिल्या विजयाने सुटकेचा निःश्वास टाकला. विजयानंतरही, षटकांच्या संथ गतीमुळे गुजरात टायटन्स संघाला मोठा फटका बसला.
कोणाला कधी व किती दंड ठोठावण्यात आला?
31 मार्च रोजी श्रेयसला दंड : पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरलाही 31 मार्च रोजी गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात षटकांचा वेग कमी ठेवल्याबद्दल 1.2 दशलक्ष रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
2 एप्रिल रोजी कोलकाता : येथील ईडन गार्डन्सवर केकेआरविरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माने 48 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली आणि संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली. सामन्यात तो त्याच्या वागणुकीमुळे अडचणीत आला. बीसीसीआयने त्याला आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.3 चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवले, जे अपमानास्पद भाषेच्या वापराशी संबंधित आहे. त्याला सामना शुल्काच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आणि त्याच्या खात्यात एक डिमेरिट पॉइंट जोडण्यात आला.
3 एप्रिल रोजी (आयपीएल) मध्ये विजय मिळवूनही, पंजाब किंग्स (पीबीकेएस) चा कर्णधार श्रेयस अय्यर आणि त्याच्या संघाला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मोठा दंड ठोठावला.


COMMENTS