Homeताज्या बातम्या

बीडमध्ये शिवदुर्गा-शिवसंवाद दौर्‍याअंतर्गत महिला आघाडीची बैठक उत्साहात संपन्न!

बीड : शिवसेना मुख्यनेते तथा राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि शिवसेनेचे संसदीय गटन

अदृश्य हातांनी दिली निवडणुकीत साथ, खा.अशोकराव चव्हाणांचे नियोजन अन् महायुतीची एकजूट; आ.अमरनाथ राजुरकरांनी मतदारांचे मानले आभार!खा.अशोकराव चव्हाणच विजयाचे खरे शिल्पकार
राज्यात पुन्हा ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा; ठाकरे गटातील अनेक जण संपर्कात असल्याचा मंत्री शिरसाट यांचा दावा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराईत युवासेनेचा विस्तारमादळमोही सर्कलसह पाच गावांत युवासेनेच्या शाखांचे उद्घाटन; नव्या पदाधिकार्‍यांची नियुक्ती


बीड : शिवसेना मुख्यनेते तथा राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि शिवसेनेचे संसदीय गटनेते मा. ना. डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली राज्यभर सुरू असलेल्या शिवदुर्गा – शिवसंवाद दौर्‍या अंतर्गत काल दि. 18 जून 2026 रोजी बीड शहरातील हॉटेल ग्रँड यशोदा येथे शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांच्या नियोजनाखाली बीड-माजलगाव विधानसभा मतदारसंघातील महिला आघाडीची भव्य व उत्स्फूर्त बैठक मोठ्या उत्साहात पार पडली.
या बैठकीस खा. डॉ ज्योतीताई वाघमारे, राष्ट्रीय सचिव श्रीमती शायना ताई एन.सी., उपनेत्या श्रीमती विजया पोटे , श्रीमती संगीता ठोंबरे ताई, श्रीमती कला शिंदे ताई, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. अनिलदादा जगताप, महिला संपर्कप्रमुख श्रीमती संगीताताई चव्हाण, महिला आघाडी जिल्हाप्रमुख श्रीमती चंद्रकलाताई बांगर, नगरसेविका श्रीमती शितलताई चक्रे, उपजिल्हाप्रमुख श्रीमती शारदाताई डोईजड तसेच तालुकाप्रमुख (बीड) श्रीमती जयश्रीताई वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी, संपर्कप्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, युवासेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण परिसर भगवामय वातावरणाने भारावून गेला. बैठकीत महिला सक्षमीकरण, सक्षम संघटन जनतेचा विश्वास या त्रिसूत्रीच्या बळावर आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना विजयाचा नवा इतिहास रचेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. महिला शक्तीचा जागर, शिवसेनेचा विचार आणि जनतेशी थेट संवाद या माध्यमातून संघटन अधिक बळकट करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
महिला सक्षमीकरणातून सक्षम संघटन उभे करणे हेच शिवदुर्गा-शिवसंवाद दौर्‍याचे उद्दिष्ट!
खा. डॉ ज्योतीताई वाघमारे, राष्ट्रीय सचिव शायनाताई एन.सी., उपनेत्या विजयाताई पोटे, उपनेत्या संगीताताई ठोंबरे, उपनेत्या कला शिंदे ताई यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिला आघाडीचे संघटन अधिक मजबूत, गतिमान आणि विजयाभिमुख करण्यासाठी बैठकीत सविस्तर मार्गदर्शन केले. गाव ते बूथ स्तरापर्यंत महिला नेतृत्व निर्माण करणे, नवीन महिला शाखाप्रमुखांची निवड, संघटन विस्तार, मतदारयादी पुनरिक्षण (डखठ), घराघरांत जनसंपर्क अभियान तसेच निवडणूक तयारीची प्रभावी रणनीती यावर त्यांनी विशेष भर दिला. दरम्यान महिला आघाडी बीड जिल्हा संपर्कप्रमुख संगीताताई चव्हाण यांनी आपल्या मनोगतामध्ये कार्य अहवाल सादर करत बीड जिल्ह्यात महिला आघाडी अधिकाधिक सक्षम बनवणार असा विश्वास दिला.

COMMENTS