बीड शहरातील सर सय्यद अहेमद खान उर्दू प्राथमिक शाळेतील कर्तव्यदक्ष सहशिक्षक सय्यद अरफात सय्यद शाहेद यांना शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या

बीड शहरातील सर सय्यद अहेमद खान उर्दू प्राथमिक शाळेतील कर्तव्यदक्ष सहशिक्षक सय्यद अरफात सय्यद शाहेद यांना शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल यावर्षीचा मानाचा ’शिक्षणमित्र आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर झाला आहे. ’साप्ताहिक युवा लोकमित्र’ वृत्तपत्राच्या 5 व्या वर्धापन दिनानिमित्त आणि 6 व्या वर्षात पदार्पण सोहळ्याचे औचित्य साधून या ऐतिहासिक पुरस्काराची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
साप्ताहिक युवा लोकमित्र’ आणि ’युवा लोकमित्र परिवार’ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय, आदर्शवत व प्रदीर्घ कामगिरी करणार्या कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्यात येतो. उच्चस्तरीय पुरस्कार निवड समितीने सय्यद अरफात यांच्या शिक्षण आणि विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याच्या क्षेत्रातील अभूतपूर्व योगदानासाठी या सर्वोच्च पुरस्कारासाठी त्यांची एकमुखाने निवड केली आहे. सय्यद अरफात इ.डल, ऊ.एव हे गेल्या 13 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात अविरतपणे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहेत. केवळ वर्गातील अध्यापनापुरते मर्यादित न राहता त्यांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत. एलिमेंट्री आणि इंटरमिजिएट चित्रकला परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी त्यांनी जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धांचे यशस्वी आयोजन करून शेकडो विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले. शिक्षणासोबतच त्यांची सामाजिक जाणीवही तितकीच प्रगल्भ आहे. ’कामरानी फाउंडेशन’च्या माध्यमातून त्यांनी समाजातील गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या आणि पुस्तकांचे वाटप करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्याचे मोठे कार्य केले आहे. याशिवाय, शिक्षक बांधवांचे विविध प्रलंबित प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी ते नेहमीच आघाडीवर असतात. सहकारी शिक्षकांना सातत्याने दर्जेदार कामासाठी प्रेरित (चेींर्ळींरींश) करावे, या उदात्त हेतूने त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन ’आदर्श शिक्षक पुरस्कार’ देण्याची कौतुकास्पद परंपरा सुरू केली आहे. सय्यद अरफात सरांच्या याच अविरत आणि निस्वार्थ सेवेची दखल घेऊन यापूर्वी त्यांना ’सर सय्यद आदर्श शिक्षक पुरस्कार’ आणि ’स्कूल एक्सप्रेस आदर्श शिक्षक पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले आहे. आता त्यांच्या शिरपेचात ’शिक्षणमित्र आदर्श शिक्षक पुरस्कारा’चा आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून,
शनिवार, 20 जून रोजी भव्य सोहळ्यात वितरण
हा दिमाखदार गौरव सोहळा येत्या शनिवार, 20 जून 2026 रोजी संध्याकाळी 06:00 वाजता ’ताज पॅलेस’, कादरपुरा, बार्शीनाका, बीड येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत,
बीड जिल्ह्यातील शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

COMMENTS