बीड: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सुनेत्रावहिनी अजितदादा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असुन त्य
बीड: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सुनेत्रावहिनी अजितदादा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असुन त्यांच्यावर काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलेली टीका अतिशय वेदनादायी, असंवेदनशील व महिला द्वेष्टी असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांनी म्हटले असुन या टीकेचा त्यांनी तीव्र शब्दात जाहिर धिक्कार केला आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, सुनेत्रावहिनी पवार यांचा कणखर बाणा आणि धीरोदात्तपणा अवघ्या महाराष्ट्राने व देशाने बघितलेला आहे. अजितदादांच्या आकस्मिक निधनाचे डोंगराएवढे दु: ख बाजुला ठेवुन त्या पक्ष कार्यासाठी सक्षमपणे पुढे सरसावल्या. पक्षाच्या पदाचे आणि उपमुख्यमंत्री पदाची धुरा स्विकारल्या पासुन त्या राञंदिवस कार्यरत असल्याचे सतत दिसुन येत आहेत. महाराष्ट्रभरातील जनतेशी संवाद साधुन त्यांची गा-हाणे ऐकून घेत मार्गी लावण्यासाठी त्या प्रयत्नशील असतात. श्रद्धेय अजितदादा इतके नसेल पण अजितदादा प्रमाणेच काम करण्याची पद्धती त्यांनी अवलंबिल्याचे दिसुन येते. सकाळी लवकर पासुन जनसंपर्क ठेवणे तसेच प्रशासकीय बैठका व कार्य बजावणे यात त्या कायम व्यस्त राहत आहेत. माञ केवळ शांतपणे व संयमाने काम करतात याचा वेगळा अर्थ लावुन त्यांना हिणविणे चुकीचे आणि संतापजनक असुन काँग्रेसच्या मूळ संस्कृतीला मुळीच शोभणारे नाही. या प्रकाराची काँग्रेस पक्षाने तातडीने जाहिर माफी मागितली पाहिजे. काँग्रेस कडुन सुनेञावहिनी पवार यांच्यावर झालेली ही टीका राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभाग कदापि सहन करणार नसल्याची तीव्र भावना व्यक्त करून सुनेञावहिनी गुंगी नव्हे आँधी आहेत हे काँग्रेस पक्षाने लक्षात ठेवावे असे कल्याण आखाडे यांनी म्हटले आहे.

COMMENTS