Homeताज्या बातम्या

आरक्षणावर कुठलाही घाला आम्ही सहन करणार नाही!बीड ते मुंबई आंबेडकरी समाजाचा पायी लाँग मार्च; उपवर्गीकरणाविरोधात जनसागर रस्त्यावर

बीड : अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाविरोधात राज्यभरातील आंबेडकरी पक्ष, संघटना आणि सामाजिक चळवळींनी निर्णायक लढ्याचा बिगु

कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर पद्मपाणि पुरस्काराने सन्मानितउत्कृष्ट पोलीस सेवा व सामाजिक बांधिलकीचा गौरव
केज तालुक्यात अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याचा कहर; शेतीचे मोठे नुकसान, वीज पडून एकाचा मृत्यू
हर्मिका जगतकर हिचे बारावी विज्ञान शाखेत घवघवीत यश

बीड : अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाविरोधात राज्यभरातील आंबेडकरी पक्ष, संघटना आणि सामाजिक चळवळींनी निर्णायक लढ्याचा बिगुल फुंकला असून, आरक्षण वाचवा, उपवर्गीकरण हटवाच्या घोषणांनी बीड शहर बुधवारी (दि. 10 जून) दणाणून गेले. बीड ते मुंबई या पायी लाँग मार्चला उत्स्फूर्त सुरुवात झाली असून हा मार्च 26 जून रोजी मुंबईतील आझाद मैदानावर समारोप होणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून निघालेल्या या मार्चमध्ये विविध आंबेडकरी संघटनांचे पदाधिकारी, युवक, महिला, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. निळ्या झेंड्यांचा महासागर, संविधान रक्षणाच्या घोषणा आणि कार्यकर्त्यांचा उत्साह यामुळे बीड शहरात आंदोलनाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले की, हा संघर्ष कोणत्याही जाती अथवा समाजाविरोधात नसून संविधानाने बहाल केलेल्या आरक्षणाच्या हक्काच्या संरक्षणासाठी आहे. अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरण करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या बदर समितीचा अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही. अहवाल जनतेसमोर न आणता निर्णय प्रक्रिया पुढे नेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. समितीचा अहवाल तातडीने सार्वजनिक करावा, सर्व संबंधित घटकांना त्याचा अभ्यास करून मते व हरकती नोंदविण्याची संधी द्यावी आणि त्यासाठीची मुदत 30 ऑगस्टपर्यंत वाढवावी, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. तसेच अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्व 59 घटकांचे प्रतिनिधी, लेखक, साहित्यिक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि समाजनेते यांचा समावेश असलेली संयुक्त समिती स्थापन करून सर्वसमावेशक चर्चा करण्याची मागणीही करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी केवळ उपवर्गीकरणाचाच मुद्दा उपस्थित न करता कंत्राटी नोकरभरती, शिक्षणाचे वाढते खासगीकरण, अनुसूचित जाती-जमातींचा अनुशेष, जातनिहाय जनगणना तसेच समान व मोफत शिक्षण या विविध प्रश्नांवरही सरकारला जाब विचारण्याचा निर्धार व्यक्त केला. संविधानिक हक्कांवर कुठलाही परिणाम होईल, असे वाटल्यास राज्यभर व्यापक लोकआंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला. या पायी लाँग मार्चला बाबुराव पोटभरे यांच्या हस्ते निळा ध्वज दाखवून प्रारंभ करण्यात आला. मार्चमध्ये सिद्धार्थ शिनगारे, अजय सरवदे, प्रेम कांबळे, धम्मा वाघमारे, आशिष चव्हाण, मायकल वाघमारे, सतीश पायाळ, प्रवीण टाकणखार, रजनीकांत वाघमारे, अरविंद कांबळे, सुनील वाकेकर, दिनकर ओंकार, विजय वाव्हूळ, अशोक कांबळे, सागर संसारे, मनोज गायकवाड, दादासाहेब शिंदे, राहुल सोनवणे, लखन जोगदंड, विश्वदीप करंजीकर, बलराज दाभाडे, शाम जाधव, संतोष जोगदंड यांच्यासह शेकडो आंबेडकरी कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
असा असणार बीड ते मुंबई पायी लाँग मार्चचा प्रवास
प्रारंभ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बीड
बीड जिल्हा : पाली – मांजरसुंभा – वैद्यकीन्ही – पाटोदा – सौताडा – आष्टी – कडा – धानोरा
अहिल्यानगर जिल्हा : जामखेड – सुपे – शिरूर
पुणे जिल्हा : भीमा कोरेगाव – पुणे – पिंपरी-चिंचवड – तळेगाव दाभाडे – लोणावळा
मुंबई मार्ग : खोपोली – पनवेल – चेंबूर
समारोप : आझाद मैदान, मुंबई (दि. 26 जून)

COMMENTS