Homeताज्या बातम्या

बीडमध्ये जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद-2026 चे आयोजन; औद्योगिक विकास व रोजगार निर्मितीवर भर

बीड : महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाच्या निर्देशानुसार बीड जिल्ह्यात बुधवार, दि. 12 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9.30 वाजता जिल्हास्तरीय गुंतवणूक पर

भगवान महाविद्यालयात कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंग (-ख  चङ) अभ्यासक्रमास शासनाची मान्यताग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची होणार सोय
मंजूर पाईपलाईनची कामे पाच महिने प्रलंबित; मिलिंद सरपते यांचे मौन आंदोलन
अल्पसंख्याक संरक्षण कायद्यासाठी लोकसेना राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामासमाजाला संरक्षण मिळेपर्यंत लोकशाही मार्गाने लढा सुरू ठेवणार-अ‍ॅड.प्रा. इलियास इनामदार
500 loan proposals of unemployed pending due to bank delays, 125 rejected,  Chief Minister's Employment Generation Program, 83 proposals out of 621  approved

बीड : महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाच्या निर्देशानुसार बीड जिल्ह्यात बुधवार, दि. 12 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9.30 वाजता जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद-2026 चे आयोजन करण्यात आले आहे. बार्शी रोडवरील हॉटेल ग्रँड यशोदा येथे ही परिषद पार पडणार आहे, अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे सहायक आयुक्त किरण जाधव यांनी दिली आहे. जिल्ह्यातील स्थानिक गुंतवणूकदार, उद्योजक आणि व्यावसायिकांना एक हक्काचे व एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या परिषदेचा मुख्य हेतू आहे. याद्वारे जिल्ह्यात नवीन गुंतवणूक आकर्षित करणे, औद्योगिक विकासाला गती देणे आणि स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे यावर भर दिला जाणार आहे. या परिषदेमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीच्या विविध संधी. राज्यातील व जिल्ह्यातील उत्पादनांची आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्यात कशी वाढवावी. उद्योजकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजना, सवलती आणि पायाभूत सुविधा विषयावर सखोल माहिती व तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. बीड जिल्ह्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला हातभार लावण्यासाठी जिल्ह्यातील संभाव्य गुंतवणूकदार, प्रस्थापित उद्योजक, व्यावसायिक तसेच उद्योग क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांनी या परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे सहायक आयुक्त किरण जाधव यांनी केले आहे.

COMMENTS