Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोकणवाडी येथे जाधव भावकीचा स्नेह मेळावा उत्साहात

अकोले : तालुक्यातील पट्टाकिल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या कोकणवाडी येथे जाधव भावकी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला. महादेव कोळी समाजातील जाधव भा

डॉ. शिंदे यांना ‘स्व. अण्णासाहेब देशमुख स्मृती पुरस्कार’ जाहीर
अकोले बाजार समितीत कांद्याला तेराशे रुपयांचा भाव
सातेवाडीच्या श्रेयशची ‘नवोदय’साठी निवड

अकोले : तालुक्यातील पट्टाकिल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या कोकणवाडी येथे जाधव भावकी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला. महादेव कोळी समाजातील जाधव भावकीच्या स्नेह मेळाव्याला मोठ्या देवाचे पूजन करून व ज्योत पेटवून सुरुवात झाली. गावात फेरी मारून मिरवणूक भैरवनाथ मंदिरात आली. भव्य मंडपात धरती वंदना आणि प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.

जगन तुकाराम जाधव हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. मान्यवरांचे स्वागत व प्रस्तावना दत्ता जाधव यांनी केले. सत्काराचा कार्यक्रम उरकल्यानंतर सर्वांनी परिचय करून दिला. जि. प. प्राथमिक शाळा कोकणवाडी शाळेतील मुला -मुलींचा सांस्कृतिक कार्यक्रम साजरा झाला.

या धावपळीच्या आणि विज्ञान युगात दुरावलेली नाती पुन्हा एकत्र आणण्याचा हा छोटासा प्रयत्न करण्यात आला. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने गावापासून दुरावलेली भावकी एकत्र आल्यामुळे एक नवीन ओळख निर्माण झाली.  

या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद प्रदेश अध्यक्ष लकी जाधव, यशवंत पारधी, किरण डगळे, विकी रोंगटे, गणपत जाधव, नामदेव जाधव, शिक्षक उत्तम जाधव, संजय जाधव, गोरख  जाधव, दत्ता जाधव, सोनू जाधव, सोपान जाधव, चिंतामण जाधव, शिक्षक शरद जाधव, राजाराम जाधव, सरपंच सुलोचना जाधव, तुकाराम जाधव, रमेश जाधव, युवराज जाधव, केतन तातळे, राजाराम जाधव, एस.के.जाधव, एकनाथ जाधव, माजी सरपंच नारायण जाधव, ज्ञानेश्वर धोंडू जाधव, प्रकाश जाधव, हिरामण जाधव, अशोक जाधव व गावकरी उपास्थित होते. 

COMMENTS