संगमनेर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श शिस्तीवर कारखान्यासह सर्व संस्थांची वाटचाल सुरू आहे. थोरात सह. साखर कारखान्यातून दारू न बनवता इंडस्ट्रियल अल्कोहोल निर्माण केले जात आहे. इथेनॉलचे महत्त्व जगाला कळाले असून सध्या युद्धामुळे जागतिक पातळीवर इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. वाढत्या इंधन समस्येला इथेनॉल हा मोठा पर्याय असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल निर्मिती प्रकल्पातून चालू हंगामातून 1 कोटी 40 लाख लिटर इथेनॉल निर्मिती झाल्याच्या प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे, व्हा. चेअरमन पांडुरंग पा.घुले ,युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात, संचालक संपतराव गोडगे, सतीश वर्पे, विलास शिंदे, रामनाथ कुटे, विजय राहणे, गुलाबराव देशमुख ,अरुण वाकचौरे, अंकुश ताजणे आदींसह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.यावेळी बोलताना थोरात म्हणाले की, राज्यभरात अनेक सहकारी कारखान्यांमधून अल्कोहोल मधून दारूची निर्मिती केली जाते. मात्र सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श शिस्तीत आणि विचारांवर या कारखान्याचे कामकाज सुरू असून थोरात सहकारी साखर कारखान्यात दारू न बनवता इंडस्ट्रियल अल्कोहोल निर्माण केले जाते. तरीही कारखान्याची वाटचाल चांगली असून कायम उच्चांकी भाव दिला आहे.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले .तर व्हा. चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी आभार मानले यावेळी कार्यकर्ते ,पदाधिकारी व कारखान्याचे अधिकारी , कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होतेपेट्रोल डिझेलला इथेनॉलचा पर्याय वीज निर्मिती आणि इथेनॉल प्रकल्प हे कारखान्याला मोठी मदत करत आहेत.युरोपियन देशांमधील युद्धामुळे जागतिक पातळीवरच इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. आता इथेनॉलचे महत्व जगाला कळाले आहे. आपल्या देशामध्येही पेट्रोल डिझेलसह इंधनाचा तुटवडा भासत आहे. याला इथेनॉल हा महत्त्वाचा पर्याय आहे. इथेनॉल निर्मिती करणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांसाठी केंद्रसरकारने रास्त भाव ठरवून दिला पाहिजे अशी मागणी करताना सांघिक यशातून कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू असल्याचे ते म्हणाले.

COMMENTS