मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईसह राज्यभरात पुनरागमन केले आहे. यामुळे उन्हापासून हैराण झालेल्या नागरिकांना पुन्हा दिलासा मिळाला आहे. अशातच हवामान विभागाने पावसाबाबत महत्त्वाचा इशारा जारी केला आहे. ज्यामध्ये राज्यातील २८ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला असून वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे.हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार, घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. पश्चिम बंगालमधील कमी दाबाचे क्षेत्र चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीत बदलले असून ते समुद्रसपाटीपासून ४.५ किमी उंचीपर्यंत सक्रिय झाले आहे. तसेच मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा पंजाबच्या अमृतसरपासून वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. यामुळे हवेतील आर्द्रता वाढली असून पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी ४०-५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, मुसळधार पाऊस आणि ताशी ४०-५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.अहिल्यानगरसह ‘या’ जिल्ह्यांना अलर्टहवामान विभागाने राज्यातील अनेक भागांत वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामध्ये विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर आणि पुणे, मराठवाड्यातील बीड, परभणी आणि हिंगोली येथे विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर जिल्ह्यांतही पावसाच्या रिमझिम सरी कोसळण्याचा अंदाज आहे.

COMMENTS