Homeताज्या बातम्या

कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा15 तारखेपर्यंत अर्ज निकाली काढण्याचे आश्वासन

बीड जिल्ह्यातील कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत बीड जिल्हा कामगार संघाच्या शिष्टमंडळाने जिल्हा कामगार अधिकारी सुधाकर कोणाळे यांची सदिच्छ

एकाच छताखाली विविध शासकीय योजनांचा लाभ; प्रशासन जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र सज्जछत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान समाधान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसादशिबिरे संपली तरी नागरिकांना सेवांचा लाभ कायम मिळणार – जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन
बीडमध्ये विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिम अंतिम टप्प्यात; ९८.४२ टक्के गणना पत्रांचे वितरण पूर्ण
भाजी मंडईत केंद्रेकर यांनी आखून दिलेली ‘लक्ष्मण रेषा’ कुचकामी ठरणार काय?जनता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रिजवान बागवान यांचा सवाल



बीड जिल्ह्यातील कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत बीड जिल्हा कामगार संघाच्या शिष्टमंडळाने जिल्हा कामगार अधिकारी सुधाकर कोणाळे यांची सदिच्छा भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी कामगारांच्या रखडलेल्या अर्जांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.
बैठकीदरम्यान संघाच्या पदाधिकार्‍यांनी कामगारांच्या नूतनीकरण (नूतनीकरण), नवीन नोंदणी, शिष्यवृत्ती अर्ज तसेच विविध कामगार कल्याणकारी योजनांशी संबंधित प्रलंबित प्रकरणांचा मुद्दा उपस्थित केला. अनेक कामगारांचे अर्ज दीर्घकाळ प्रलंबित असल्याने त्यांना योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याचे संघाने निदर्शनास आणून दिले. यावर जिल्हा कामगार अधिकारी सुधाकर कोणाळे यांनी सकारात्मक भूमिका घेत संबंधित सर्व प्रलंबित अर्ज आणि प्रकरणांचा आढावा घेऊन येत्या 15 तारखेपर्यंत ती निकाली काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिले. तसेच कामगारांच्या हितासाठी प्रशासनाकडून आवश्यक सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रशासनाने दाखविलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल बीड जिल्हा कामगार संघाच्या पदाधिकार्‍यांनी समाधान व्यक्त केले. कामगारांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संघाकडून सातत्याने पाठपुरावा सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. या भेटीदरम्यान बीड जिल्हा कामगार संघाचे अध्यक्ष नवीद खान (बाबा खान), उपाध्यक्ष इमरान इनामदार, सचिव तोफिक काझी, कार्याध्यक्ष शेख सोहेल, सामाजिक कार्यकर्ते शाहनवाज खान, सय्यद सलमान अली, नारायण निंबाळकर, नवीद भाई, इमरान भाई तसेच पत्रकार इरफान भाई उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी जिल्हा कामगार अधिकारी सुधाकर कोणाळे यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल बीड जिल्हा कामगार संघाच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. संघटनेने भविष्यातही कामगारांच्या हक्कांसाठी आणि कल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रयत्न सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

COMMENTS