Homeताज्या बातम्या

बीड शहरातील ’बिंदुसरा’ नदी पुनरुज्जीवनाला मिळणार गती! महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन परिषदेत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे निर्देश

बीड : मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन परिषदेच्या आढावा बैठकीत राज्यातील प्रदूषित नद्यांच्या पुनरुज्ज

महिला कला महाविद्यालयात मा. अशोकरावजी पाटील (दादा) यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
मुंबई पोलिस दलात निवड झालेल्या यश जाधवचा लिंबागणेशकरांकडून जाहीर सत्कारलिंबागणेश
कृषीसाहित्य विक्रेता संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी तिसर्‍यांदा मनमोहन कलंत्री बिनविरोधजिल्हा व तालुका संघटनेच्या वतीने सत्कार

बीड : मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन परिषदेच्या आढावा बैठकीत राज्यातील प्रदूषित नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी तातडीने कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. या बैठकीत बीड शहराची जीवनवाहिनी असलेल्या बिंदुसरा नदीच्या पुनरुज्जीवनासाठी ठोस पावले उचलण्याबाबतही चर्चा झाल्याने नदी पुनरुज्जीवनाच्या कामाला गती मिळण्याचे संकेत मिळाले आहेत.

प्रदूषित नद्यांचे प्रदूषण कमी करणे, नद्यांचा नैसर्गिक प्रवाह कायम ठेवणे, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प प्रभावीपणे राबविणे, नदीपात्रातील व नदीकाठावरील अतिक्रमणे रोखणे, औद्योगिक प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे तसेच नदीकाठ संवर्धन आणि वृक्षारोपणाला गती देण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. नदी पुनरुज्जीवनाच्या मोहिमेत लोकसहभाग वाढविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. बिंदुसरा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर आणि त्यांच्या सहकार्‍यांकडून सातत्याने निवेदने, आंदोलने आणि प्रशासकीय पाठपुराव्याच्या माध्यमातून मांडण्यात येत आहे. या पाठपुराव्याची दखल घेत शासनस्तरावर बिंदुसरा नदी पुनरुज्जीवनासाठी हालचाली सुरू झाल्याचे डॉ.गणेश ढवळे यांनी म्हटले आहे. राज्यातील नदी पुनरुज्जीवन मोहिमेची सुरुवात बीडच्या बिंदुसरा नदीपासून करावी अशी मागणीही डॉ. गणेश ढवळे यांनी केली आहे. बिंदुसरा नदी स्वच्छ व प्रवाही झाल्यास बीड शहराच्या पर्यावरणासोबतच भूजल पातळी, जैवविविधता आणि नागरिकांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. बिंदुसरा नदी पुनरुज्जीवनाला गती देण्याचे संकेत दिल्याबद्दल डॉ. गणेश ढवळे यांनी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे आभार मानले आहेत.

सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्याची दखल – डॉ. गणेश ढवळे

भाजपा नेते डॉ. योगेश क्षीरसागर यांचा पाठपुरावा सुरूच बिंदुसरा नदीच्या पुनरुज्जीवनासाठी भाजपा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांच्याकडूनही शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचे सांगण्यात आले. निवडणुकीदरम्यान बीड नगरपरिषद भाजपच्या ताब्यात दिल्यास बिंदुसरा नदीच्या पुनरुज्जीवनासाठी शासनस्तरावर विशेष प्रयत्न करण्याचे आश्वासन ना. पंकजा मुंडे यांनी दिले होते.

डॉ. गणेश ढवळे यांची मागणी राज्यातील नदी पुनरुज्जीवन मोहिमेची सुरुवात बीड शहरातील बिंदुसरा नदीपासून करावी. नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया, अतिक्रमण हटविणे, नदीपात्राचे संवर्धन आणि वृक्षारोपण यासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करावा.

नदी पुनरुज्जीवनासाठी प्राधान्य

  • प्रदूषण कमी करण्यासाठी तातडीचा कृती आराखडा
  • सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प प्रभावी करणे
  • नदीकाठावरील अतिक्रमणे रोखणे
  • औद्योगिक प्रदूषणावर नियंत्रण

बिंदुसरा नदीचे महत्त्व बिंदुसरा नदी स्वच्छ व प्रवाही झाल्यास बीड शहराची पर्यावरणीय स्थिती सुधारण्यासोबत भूजल पातळी, जैवविविधता आणि नागरिकांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.

पाठपुराव्याला यश डॉ. गणेश ढवळे, शेख युनुस,रामनाथ खोड, माजी सैनिक अशोक येडे, रामधन जमाले, सुदाम तांदळे,मुबीन शेख, पांडुरंग हराळे सहकार्‍यांकडून निवेदने आणि बिंदुसरा नदीपात्रात बिंदुसरा नदीचे पुनरूज्जीवन करा आंदोलनाच्या माध्यमातून बिंदुसरा नदीच्या पुनरुज्जीवनासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.

COMMENTS