देवळाली प्रवरा: येथील सुपुत्र विशाल सुभाष गाडेकर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) माध्यमातून घेण्यात आलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच

देवळाली प्रवरा: येथील सुपुत्र विशाल सुभाष गाडेकर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) माध्यमातून घेण्यात आलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदाच्या स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे देवळाली प्रवरा शहरासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अत्यंत कठीण व स्पर्धात्मक परीक्षेत कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर विशाल गाडेकर यांनी हे यश मिळविले. या यशामुळे त्यांनी देवळाली प्रवरा शहराचे नाव राज्यभर उज्ज्वल केले असून, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या ग्रामीण भागातील युवकांसाठी एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
विशाल गाडेकर यांच्या या यशाबद्दल नातेवाईक, मित्रपरिवार, सामाजिक, राजकीय तसेच शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून त्यांचे मनापासून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या भावी प्रशासकीय सेवाकार्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

COMMENTS