Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देवळाली प्रवरा नगरपरिषदेत जनगणना प्रशिक्षण उत्साहात

देवळाली प्रवरा : आगामी जनगणनेच्या पार्श्वभूमीवर देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या वतीने अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रशिक्षणाद्वारे जनगणना प्रक्रियेबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.चार्ज अधिकारी तथा मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात जनगणनेचे राष्ट्रीय महत्त्व अधोरेखित केले. “जनगणना ही केवळ लोकसंख्या मोजण्याची प्रक्रिया नसून देशाच्या विकासाचा पाया आहे. शासनाच्या विविध योजना, निधी नियोजन तसेच सामाजिक व आर्थिक धोरणांची आखणी अचूक आकडेवारीवर अवलंबून असते. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याने ही जबाबदारी प्रामाणिकपणे व दक्षतेने पार पाडावी,” असे त्यांनी सांगितले. तसेच डिजिटल पद्धतीने होणाऱ्या जनगणनेबाबत माहिती देत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले.प्रशिक्षण कार्यक्रमात प्रकल्प अधिकारी सुनील गोसावी व माध्यमिक शिक्षक सचिन निमसे यांनी प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केले. त्यांनी जनगणना प्रक्रियेतील विविध टप्पे, माहिती संकलन पद्धती, फॉर्म भरण्याचे नियम तसेच प्रत्यक्ष कामातील अडचणींवर सविस्तर माहिती दिली. त्यांच्या सादरीकरणामुळे उपस्थितांना संपूर्ण प्रक्रिया अधिक स्पष्ट झाली.यावेळी प्रशासकीय अधिकारी दीपक जग्रवाल उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी वसुली विभाग प्रमुख रामदास म्हस्के यांनी स्वागत करून प्रशिक्षणाच्या उद्देशाबाबत माहिती दिली. शेवटी ग्रंथपाल संभाजी वाळके यांनी आभार प्रदर्शन केले.या प्रशिक्षणामुळे जनगणना कार्य अधिक प्रभावी, अचूक व सुव्यवस्थित पद्धतीने पार पाडण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भूषण नवाल, वैभव ठोबरे, सागर होले व गौरव शेळके यांनी विशेष परिश्रम घेतले.

 रेल्वेची मालमत्ता चोरणाऱ्या संघटित टोळीचा पर्दाफाश चौघांना अटक ; ११ लाखांची सामग्री जप्त
देवळाली प्रवरा येथे जनगणना प्रशिक्षण कार्यक्रमअप्पर जिल्हाधिकारी कोळेकर यांचे मार्गदर्शन ; पारदर्शी काम करण्याच्या सूचना
चोरट्यांच्या बंदोबस्तासाठी नागरिकच ‘गस्ती’वर ‘अलर्ट सिस्टीम’मुळे सुरक्षा वाढली;प्रवरा पट्ट्यात चोरट्यांचा धुमाकूळ

COMMENTS