Homeताज्या बातम्या

कळसाचे दर्शन म्हणजेच विठ्ठलाचे दर्शन; ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक यांचे काल्याच्या कीर्तनात निरूपण

देवळाली प्रवरा: देवळाली प्रवरा येथील श्री योगीराज त्रिंबकराज पायी दिंडी सोहळ्याची सांगता भक्तीमय वातावरणात पार पडली. सांगता सोहळ्यानिमित्त आयोजित

सिक्कीम बोगदा दुर्घटनेतील मृतांची संख्या २० वर; ५ जण अद्याप अडकले, मिथेन वायूमुळे बचावकार्याला अडथळे
राष्ट्रकुल स्पर्धेत नाशिकच्या दिलीप गावितची सुवर्ण झेप; १०० मीटर शर्यतीत नवा विक्रम, भारताला दुहेरी यश
ज्या शाळेने घडविले, त्या शाळेचे ऋण फेडण्यासाठी माजी विद्यार्थ्याचा पुढाकार; १०० विद्यार्थ्यांना मोफत शालेय बॅग वाटप

देवळाली प्रवरा: देवळाली प्रवरा येथील श्री योगीराज त्रिंबकराज पायी दिंडी सोहळ्याची सांगता भक्तीमय वातावरणात पार पडली. सांगता सोहळ्यानिमित्त आयोजित काल्याच्या कीर्तनात ह.भ.प. महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी वारकरी संप्रदायातील भक्ती, समता आणि परमार्थाचे महत्त्व अत्यंत प्रभावीपणे विशद केले.

कीर्तनात बोलताना त्यांनी सांगितले की, पंढरीच्या विठ्ठल मंदिराच्या कळसाचे दर्शन जरी झाले तरी वारकऱ्यांना प्रत्यक्ष विठ्ठलाचे दर्शन झाल्याचा असीम आनंद मिळतो. त्या दर्शनाने वारकरी पूर्णपणे तृप्त होतो. जसा भुकेला माणूस जेवणानंतर तृप्तीचा ढेकर देतो, त्याचप्रमाणे वारकरी दरवर्षी पंढरीच्या दर्शनाने आत्मिक समाधान प्राप्त करतो. पंढरीच्या वारीचे वर्णन शब्दांत करणे अशक्य असून तिचा अनुभव प्रत्यक्ष वारीत जाऊनच घ्यावा लागतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

“परमार्थामध्ये मोठी ताकद आहे. संतांनी कधीही जातीचा विचार केला नाही; ना स्वतःची जात सांगितली, ना कोणाची जात विचारली. त्यांनी केवळ समाजाचे सेवक म्हणून सेवा केली,” असे सांगत त्यांनी वारकरी संप्रदायाच्या समतेच्या आणि बंधुत्वाच्या विचारांचा गौरव केला.

यावेळी संत तुकाराम महाराजांचा “कोणी एकी भुलली नारी, विकितां गोरस म्हणे घ्या हरी…” हा अभंग निरूपणासाठी घेत त्यांनी भक्तीचा गूढ अर्थ उलगडून सांगितला. तसेच विनोबा भावे यांनी पांडुरंगाच्या चरणी मस्तक टेकवून अश्रूंनी व्यक्त केलेल्या भावनेचा दाखला देत, त्या चरणांना ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज आणि एकनाथ महाराज यांसारख्या महात्म्यांचा स्पर्श झाल्यानेच भावे यांना त्या संतांचे दर्शन झाल्याची अनुभूती झाली होती, असा प्रसंग त्यांनी सांगून भाविकांना भावुक केले. देवळाली प्रवरा हे योगीराज त्रिंबकराज, बाबुराव पाटील आणि संत महिपती महाराज यांच्या महान दिंडी परंपरेमुळे भक्तीरसाने नटलेले गाव असल्याचे गौरवोद्गारही मंडलिक महाराजांनी काढले.

माजी नगरसेवक सचिन ढुस यांनी दिंडी सोहळ्याची सविस्तर माहिती देऊन सोहळ्यास सर्वतोपरी मदत करणाऱ्या सर्व भाविकांचे आभार मानले. या प्रसंगी तुकाराम महाराजांचे वंशज एकनाथ महाराज मोरे, ह.भ.प. सिताराम ढुस, दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष बाबा महाराज मोरे, सुरेशशेठ वाबळे, सोमनाथ महाराज माने, आबा महाराज कोळसे, हिराताई महाराज मोकाटे, नामदेव महाराज शास्त्री जाधव, सुभाष महाराज विधाटे, बाबासाहेब महाराज वाळूंज यांच्यासह देवळाली, सोनगाव, आंबी, उक्कलगाव, मातापूर, लोणी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS