Homeताज्या बातम्या

तामिळनाडूचे विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन अटकेत; अभिनेत्री तृषाबाबतच्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यामुळे कारवाई, राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद

चेन्नई : अभिनेत्री तृषा हिच्याविषयी कथित आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप झाल्यानंतर तामिळनाडूतील द्रविड मुनेत्र कळघमचे (द्रमुक) नेते आणि विधानसभ

तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळाविजय यांना काँगे्रसनंतर सीपीआयचा पाठिंबा
तामिळनाडूमध्ये ‘थलापती’ विजय यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन होणार
तामिळनाडूत विजय सरकारचा विश्‍वासदर्शक ठराव मंजूर144 आमदारांचा पाठिंबा; विरोधकांची तटस्थ भूमिका
तामिळनाडूचे विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन पोलिसांच्या ताब्यात, अभिनेत्री  त्रिशाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप | Saamana (सामना)

चेन्नई : अभिनेत्री तृषा हिच्याविषयी कथित आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप झाल्यानंतर तामिळनाडूतील द्रविड मुनेत्र कळघमचे (द्रमुक) नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांना मंगळवारी पोलिसांनी अटक केली. या कारवाईमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे.

पोलिसांनी उदयनिधी स्टॅलिन यांच्याविरुद्ध विविध कायदेशीर तरतुदींनुसार सहा कलमांखाली गुन्हा नोंदविला आहे. अटक होण्यापूर्वी त्यांनी मद्रास उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्या अर्जावर सुनावणी होण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. सोमवारी तंजावर येथे कावेरी नदीच्या पाणीवाटपाच्या प्रश्नावर आयोजित करण्यात आलेल्या एका आंदोलनात उदयनिधी स्टॅलिन भाषण करत होते. त्यावेळी उपस्थितांमधून अभिनेत्री तृषाचे नाव घेत घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर उदयनिधी यांनी केलेल्या एका वक्तव्याचा अर्थ दुहेरी असल्याचा आरोप विरोधकांनी केला. हे वक्तव्य महिलांचा अवमान करणारे असल्याचा दावा करत विविध पक्षांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. मात्र, उदयनिधी स्टॅलिन यांनी हा आरोप फेटाळून लावत आपण कावेरीच्या पाण्याबाबतच बोलत होतो, कोणत्याही व्यक्तीचा अवमान करण्याचा हेतू नव्हता, असे स्पष्ट केले. अटकेपूर्वी माध्यमांशी संवाद साधताना उदयनिधी स्टॅलिन म्हणाले, “मी कोणाचेही नाव घेतलेले नाही. मी कोणत्याही महिलेविषयी अपमानास्पद शब्द वापरलेले नाहीत. मी कायद्याचा आदर करतो आणि कोणत्याही कारवाईला सामोरे जाण्यास तयार आहे.”

विविध गंभीर आरोपांखाली गुन्हा दाखल उदयनिधी स्टॅलिन यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात महिलेचा अवमान करणे, जाणूनबुजून अपमानास्पद वक्तव्य करून शांतता भंग होईल अशी परिस्थिती निर्माण करणे, समाजात वैमनस्य पसरविण्याचा प्रयत्न, गुन्हेगारी कट रचणे आणि धमकीसदृश वर्तन करणे अशा विविध आरोपांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय तामिळनाडू महिला छळ प्रतिबंधक कायदा, 2002 तसेच माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित कायद्यातील तरतुदींचाही या प्रकरणात समावेश करण्यात आला आहे.

द्रमुकचा निषेध, समर्थक रस्त्यावर उदयनिधी स्टॅलिन यांच्या अटकेनंतर द्रमुकने राज्यभर निषेध आंदोलनाची घोषणा केली. चेन्नईसह अनेक ठिकाणी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून सरकारविरोधात घोषणाबाजी केली. ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने करण्यात आल्याचा आरोप द्रमुककडून करण्यात आला. द्रमुकचे वरिष्ठ नेते आणि खासदार टी. आर. बालू यांनी उदयनिधी स्टॅलिन यांच्या समर्थनार्थ भूमिका घेत सांगितले की, उदयनिधी यांनी कोणत्याही महिलेचे नाव घेतलेले नव्हते आणि त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे.

COMMENTS