Homeताज्या बातम्या

माजलगाव तालुक्यातील सुलतानपूर जि. प. शाळेची इमारत दुरवस्थेत; स्वच्छतागृहाचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांचे हाल

माजलगाव: तालुक्यातील टाकरवण केंद्रांतर्गत येत असलेल्या सुलतानपूर येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत अत्यंत दुरवस्थेत पोहोचली आहे. शाळेत स्वच्छतागृहा

रस्त्यावरील कथित अतिक्रमण प्रकरण पुन्हा चर्चेत; जिल्हा परिषदेकडून चौकशीचे आदेश
गुलवीर सिंग आणि हरजिंदर कौरची रौप्य पदकांवर मोहर; राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची दमदार कामगिरी
कार्यकर्ता प्रामाणिक असेल तर नेत्याची खंबीर साथ मिळते – अ‍ॅड. सुभाष राऊत; समता परिषदेची जिल्हास्तरीय बैठक संपन्न

माजलगाव: तालुक्यातील टाकरवण केंद्रांतर्गत येत असलेल्या सुलतानपूर येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत अत्यंत दुरवस्थेत पोहोचली आहे. शाळेत स्वच्छतागृहाचा अभाव असून, पावसाळ्यात परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असल्याने विद्यार्थ्यांना नाहक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सध्या या शाळेत पहिली ते पाचवीपर्यंत एकूण ८५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, मूलभूत सुविधांअभावी या विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. शाळेमध्ये आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, यासाठी पालकांनी प्रशासनाकडे वारंवार निवेदने दिली आहेत. तरीही अद्याप प्रशासनाकडून कोणताही निधी उपलब्ध झाला नसल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केला आहे.

पावसाळा सुरू झाल्याने शाळेची बिकट अवस्था पाहता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने या समस्येची तातडीने गंभीर दखल घ्यावी आणि शाळेच्या इमारत दुरुस्तीसाठी तसेच इतर सुविधांसाठी तात्काळ निधी मंजूर करावा, अशी जोरदार मागणी डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.

COMMENTS