Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

राज्यात एटीएसने टाकले छापासत्रदेशविरोधी कारवायांमुळे मुंबई, पुणे, नाशिक, नांदेडमध्ये कारवाई

मुंबई : पाकिस्तानशी संबंधित गुन्हेगारी जाळ्याविरोधात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने राज्यभरात मोठी मोहीम हाती घेतली आहे. मुंबई, पुणे, नागपूर,

विठ्ठलनामाच्या जयघोषात आ. बालाजी कल्याणकर यांचा सुरमयी वाढदिवस साजराशास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांच्या स्वरधारांनी नांदेडकर चिंब झाले, निसर्गालाही मोहित केले!
वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन (एचएसआरपी)नंबरप्लेट 30 जुन पुर्वी बसविणे बंधनकारक
जनगणना 2026 मध्ये प्रत्येकाने सहभाग नोंदवावा; ही सामाजिक जबाबदारी – शेख युनूस


मुंबई : पाकिस्तानशी संबंधित गुन्हेगारी जाळ्याविरोधात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने राज्यभरात मोठी मोहीम हाती घेतली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, अकोला, नांदेड, नाशिक, जळगाव, नालासोपारा आणि मिरारोडसह अनेक शहरांमध्ये एकाचवेळी धाडी टाकण्यात आल्या आहेत. सामाजिक माध्यमांच्या माध्यमातून भारतीय तरुणांशी संपर्क वाढवणार्‍या पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्या नेटवर्कचा शोध घेण्यासाठी ही कारवाई सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
तपास यंत्रणांच्या प्राथमिक माहितीनुसार, काही तरुण सामाजिक माध्यमांद्वारे भट्टी किंवा त्याच्या टोळीच्या संपर्कात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर संशयितांच्या हालचाली, डिजिटल व्यवहार आणि सामाजिक माध्यमांवरील संपर्कांची सखोल पडताळणी केली जात आहे. काही ठिकाणी मोबाईल, संगणक आणि इतर इलेक्ट्रॉनिक साधनांची तपासणीही करण्यात येत असल्याचे समजते. सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार, शहजाद भट्टी हा पाकिस्तानातील लाहोर येथील रहिवासी असून परदेशातून आपले जाळे चालवत असल्याचा संशय आहे. सामाजिक माध्यमांचा वापर करून भारतातील तरुणांशी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न त्याच्याकडून केला जात असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती. त्यानंतर राज्य आणि केंद्रीय यंत्रणांनी त्याच्यावर लक्ष केंद्रित केले. गेल्या काही महिन्यांत देशातील काही हेरगिरी आणि दहशतवादी भरतीशी संबंधित तपासांमध्येही त्याचे नाव समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर महाराष्ट्र एटीएसने स्वतंत्र तपास सुरू करून संबंधित संपर्कांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली होती. त्यातूनच आता राज्यभरात धडक कारवाई करण्यात येत आहे.
तपास अधिकार्‍यांकडून संबंधित तरुणांना कोणत्या माध्यमातून संपर्क साधला गेला, त्यांना कोणत्या प्रकारचे संदेश पाठवले गेले आणि त्यामागील उद्देश काय होता, याची चौकशी केली जात आहे. या प्रकरणात पुढील काही दिवसांत आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सामाजिक माध्यमांच्या माध्यमातून तरुणांना प्रभावित करून देशविरोधी कारवायांसाठी वापरण्याचे प्रयत्न होत असल्याने सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. राज्यभर सुरू असलेली ही मोहीम गुन्हेगारी आणि संशयित नेटवर्क मोडून काढण्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे.

COMMENTS