Homeताज्या बातम्या

ज्येष्ठ समाजसेवक भीमरावजी दुधारे यांचे हृदयविकाराने निधन; भोकर तालुक्यासह नांदेड जिल्ह्यात शोककळा

भोकर : तालुक्यातील ज्येष्ठ समाजसेवक तथा आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते भीमरावजी दुधारे यांचे बुधवार (दि. ३ जून) रोजी सकाळी हृदयविकाराच्या ती

माहूर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार कमिशनच्या प्रतीक्षेत; ६ महिन्यांपासून मानधन थकीत, १ जुलैपासून कामबंद आंदोलनाचा इशारा
अखेर सहा महिन्यांनंतर तामसा ग्रामपंचायतीला प्रशासक; प्रलंबित प्रश्न सुटण्याची नागरिकांना आशा
लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांना माहूरकरांची भावपूर्ण आदरांजली; प्रतिमेचे पूजन करून अभिवादन

भोकर : तालुक्यातील ज्येष्ठ समाजसेवक तथा आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते भीमरावजी दुधारे यांचे बुधवार (दि. ३ जून) रोजी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने भोकर तालुक्यासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यात शोककळा पसरली असून विविध सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.

गरजू व वंचित घटकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहणाऱ्या भीमरावजी दुधारे यांनी आयुष्यभर समाजसेवेचा वसा जपला. अनेक सामाजिक उपक्रम, जनजागृती मोहिमा तसेच फुले-शाहू-आंबेडकर विचारांच्या प्रसारासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या कार्यामुळे समाजातील अनेकांना आधार व प्रेरणा मिळाली.

त्यांच्या निधनाबद्दल ॲड. प्रसेनजित आनंदराव येडके (नांदेकर) यांनी शोक व्यक्त करताना म्हटले की, भीमरावजी दुधारे यांचे अचानक जाणे ही समाजाची मोठी हानी आहे. त्यांचे निःस्वार्थ समाजकार्य, मानवतेप्रती असलेली बांधिलकी आणि लोकांसाठी केलेले अथक प्रयत्न सदैव स्मरणात राहतील. त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक आणि मोठा मित्रपरिवार आहे. दुधारे परिवारावर कोसळलेल्या या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळावी, अशी प्रार्थना विविध स्तरांतून व्यक्त केली जात आहे.

COMMENTS