Homeताज्या बातम्या

घरफोडी करत सात लाखांचा ऐवज लंपास; नेवासा तालुक्यातील माका येथील आखाडे वस्तीवरील धक्कादायक घटना

सोनई: नेवासा तालुक्यातील माका येथील आखाडे वस्तीवर अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे ७ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली

संतांनी पर्यावरणपूरक जीवनाचा संदेश दिला; पंढरपुरात ‘पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी’ उपक्रमाचा समारोप! मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन
आषाढी वारीचा अध्यात्म सोहळा जगासाठी दिशादर्शक: माजी मंत्री बाळासाहेब थोरात; संगमनेरमध्ये एकादशीचा मोठा उत्साह
पक्ष फोडाफोडीमुळे लोकशाहीला धोका; पक्षांतर करणाऱ्यांनी राजीनामा देऊन पुन्हा जनतेसमोर जावे – विजय वडेट्टीवार

सोनई: नेवासा तालुक्यातील माका येथील आखाडे वस्तीवर अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे ७ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. २२ जुलै रोजी रात्री साडेनऊ ते दि. २३ जुलै रोजी पहाटे ५.४५ वाजण्याच्या दरम्यान माका येथील आखाडे वस्तीवरील राहत्या घराच्या खिडकीची तोडफोड करून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटाची उचकापाचक करून त्यातील ७ लाख १५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तसेच ८० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ७ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

याप्रकरणी अभिषेक साहेबराव आखाडे (वय ३१, रा. आखाडे वस्ती, देडगाव रोड, माका) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर जाधव करीत आहेत.

या घटनेमुळे माका परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

COMMENTS