Homeताज्या बातम्या

जलसंपदाशी संबंधित सर्वच प्रक्रिया ऑनलाईन करणार; मंत्री विखे पाटील यांची घोषणा, शेतकऱ्यांसाठी प्रमुख सुविधा

अहिल्यानगर: ज्या ज्या ठिकाणी पाण्याच्या अनुषंगाने शेतकऱ्यांचा संबंध येतो, अशा जलसंपदा विभागाशी संबंधित सर्वच प्रक्रिया येत्या महिनाभरात ऑनलाईन कर

गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे ५ जणांचा मृत्यू; आसाममध्ये पुराचा हाहाकार, बळींचा आकडा ६१ वर
सिक्किममध्ये बोगदा दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू; जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात भयानक घटना, बचावमोहीम युद्धपातळीवर
नांदेडमध्ये ‘जवाब दो महामोर्चा’; विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

अहिल्यानगर: ज्या ज्या ठिकाणी पाण्याच्या अनुषंगाने शेतकऱ्यांचा संबंध येतो, अशा जलसंपदा विभागाशी संबंधित सर्वच प्रक्रिया येत्या महिनाभरात ऑनलाईन करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे अंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर येथील विभागीय कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर राज्याचे आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आ. राजेश क्षीरसागर, महापौर रूपाराणी निकम, राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, अशोक माने, अमल महाडिक, माजी आ. संजय घाटगे, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुण्याचे कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत धुमाळ प्रामुख्याने उपस्थित होते.

विखे पाटील म्हणाले की, कृष्णा व गोदावरी खोरे महामंडळाची सुमारे ५६ हजार एकर जमीन जलसंपदा विभागाने स्वतःच्या नावावर करून घेतली आहे. यासाठी कार्यरत असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन करून भविष्यात राज्यामधील दुष्काळी भागातील पाणी विषमता दूर करण्याला जलसंपदा विभाग प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले. जलसंपदा विभागाचे अधिकारी धरणाच्याच ठिकाणी कार्यरत राहतील याचे नियोजन सुरू असल्याचेही ते म्हणाले. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा खऱ्या अर्थाने सहकाराची भूमी असल्याचे सांगत विखे पाटील यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा दिला.

पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, या विभागाने काळम्मावाडी धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्याच्या अस्तरीकरणाला मान्यता देऊन या धरणाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या (सुप्रमा) अनुषंगाने त्वरित येथील कामकाजाला प्रारंभ करण्यात यावा. कोल्हापूर शहरातील ब्ल्यू व रेड लाईनबाबत ठोस असा निर्णय व्हावा. त्याचबरोबर अलमट्टी धरणाच्या अनुषंगाने जे सातत्याने उभे राहणारे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जलसंपदा विभागाने सर्वोच्च न्यायालयातील वकिलांशी बोलावे, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली.

विखे पाटील यांनी सिंचन भवन येथील अद्यावत अशा जलसंपदा विभागीय कार्यालयाची पाहणी करून त्या ठिकाणी वृक्षारोपण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडित कंदले यांनी केले, तर आभार प्रदर्शन (जलसंपदा) अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी मानले.

COMMENTS