Homeताज्या बातम्या

महागाईविरोधात शरद पवार गटाचे मुंबईत आंदोलन

रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे पोलिसांच्या ताब्यात मुंबई : वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि घरगुती वापराच्या वस्तूंच्या वाढत्या किमतीं

इंधन दरवाढीचा भडका! पेट्रोल-डिझेल महागल्याने वाहनधारक आणि नागरिक हैराण
पाकिस्तानात पेट्रोलच्या दरात ६ रुपयांची कपात
मध्यपूर्वेतील युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम?

रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे पोलिसांच्या ताब्यात

मुंबई : वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि घरगुती वापराच्या वस्तूंच्या वाढत्या किमतींच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने नवी मुंबईत बुधवारी तीव्र आंदोलन छेडले. या आंदोलनादरम्यान पक्षाचे प्रमुख नेते आमदार रोहित पवार, जितेंद्र आव्हाड आणि शशिकांत शिंदे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याशिवाय रोहिणी खडसे आणि सक्षणा सलगर यांनाही महिला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

महागाईच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून अनोख्या पद्धतीने निदर्शने केली. काही कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच चूल पेटवून भाकरी तयार करत सर्वसामान्यांच्या वाढत्या खर्चाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, आंदोलनात सहभागी झालेल्या एका महिलेची प्रकृती अचानक बिघडल्याने तिला तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली.

आंदोलनानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी राज्य आणि केंद्र शासनावर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन अधिक कठीण होत आहे. पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या दरवाढीचा थेट परिणाम कुटुंबांच्या मासिक खर्चावर होत असून मध्यमवर्गीय आणि कामगार वर्ग आर्थिक संकटाचा सामना करत आहे. नागरिकांच्या अडचणी शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले असून जनतेच्या प्रश्नांसाठी हा संघर्ष सुरूच राहील, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

COMMENTS