Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पावसाने ओढ दिल्यास विज निर्मितीसाठीचे पाणी पिण्यासह सिंचनास देण्याचा विचार : ना. शंभूराज देसाई

सातारा / प्रतिनिधी : पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देवून या वर्षीच्या जुन अखेरपर्यंत पुरेल अशा पध्दतीने धरणातील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवाव

औंधच्या श्री यमाई देवीचा रथोत्सव साधेपणाने साजरा
वन हदीतील लेंडीखत विक्री करणाऱ्यांवर कारवाई करणार l LokNews24
विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी बांधला लाकडी सेतू; मोरणा विभागातील गोकुळ धावडे विद्यालयातील शिक्षकांची अनोखी शक्कल

सातारा / प्रतिनिधी : पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देवून या वर्षीच्या जुन अखेरपर्यंत पुरेल अशा पध्दतीने धरणातील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवावा. त्याचबरोबर ठरल्याप्रमाणे पाण्याचे आर्वतन सोडण्यात यावे. तुर्तास या आर्वतनामध्ये बदल करु नये. तसेच सध्या सांगली जिल्ह्यातील लोकांच्या मागणीस्तव एक टिएमसी पाणी कोयना धरणातून सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाने जर ओढ दिली तर विजनिर्मितीसाठी राखीव असलेल्या पाणीसाठ्याचा वापर पिण्यासह सिंचनासाठी करण्याचा विचार असल्याचे सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. तसेच नागरिकांनीही पाण्याचा काटकसरीने वापर करावा अनावश्यक वापर टाळावा, असे आवानही त्यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्याबाबत आढावा बैठक झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ना. देसाई बोलत होते. पत्रकार परिषदेस जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
ना. देसाई म्हणाले, दुर्गाउत्सवादरम्यान जिल्ह्यात परतीचा पाऊस पडतो. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण अल्प असल्याने संभाव्य पाणी टंचाईस सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. आज जलसंपदा विभागाच्या सर्व अधिकार्‍यांसमवेत बैठक घेऊन जिल्ह्यातील विविध धरणामधील पाणी साठ्याची माहिती घेण्यात आली आहे. बैठकित डिसेंबर 2023 अखेरपर्यंतचे पाण्याचे नियोजन करावे. पाण्याची उपलब्धता पाहून पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी प्राधान्याने सोडावे. कोयना धरणातील 67 टक्के पाणी विद्युत निर्मिती व 33 पाणी पिण्यासाठी राखीव असते. याबाबत डिसेंबर नंतर परिस्थितीचा आढावा घेऊन ज्यादाचे पाणी पिण्यासाठी व सिंचनासाठी राखीव ठेवण्याबाबत शासनास प्रस्ताव पाठवावा. सध्याच्या परिस्थितीत रब्बीची आर्वतने ठरल्याप्रमाणे सोडावित. उत्तरमांड धरणाची उर्वरित कामे तातडीने पूर्ण करावी. ही कामे पूर्ण झाल्यानंतर उंब्रज, ता. कराड परिसरातील पाण्याचा प्रश्‍न कायमचा मार्गी लागेल. ज्या धरणांच्या कामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी मंत्रालय स्तरावर प्रलंबित आहेत. त्याचा पाठपुरावाही केला जाईल. तसेच मागणीनुसार सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या मागणीवरून कोयना धरणातून 1 टिएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. पायथा वीजगृह सुरु करण्यात आले असून त्याद्वारे 1050 क्यूसेक्स पाण्याचा कोयना नदीच्या पात्रात विसर्ग करण्यास आज सुरुवात केली असल्याचेही देसाई यांनी सांगितले.

COMMENTS