Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ऍथलेटिक्स स्पर्धेत वैष्णवी शेंडगे द्वितीय  

श्रीगोंदा : इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे आयोजित राज्यस्तरीय ऍथलेटिक्स स्पर्धा पुणे येथील समर्थ सणस मैदानावर उत्साह

आयपीएल २०२६ च्या वेळापत्रकात अचानक बदल
ड्रॉप रो बॉल’ स्पर्धेत चिंचोली विद्यालयातीचे यश 
बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा यू-16 संघ बिडकीनकडे रवाना; एडीएफसी क्रिकेट क्लब व युनिक स्पोर्ट्सकडून खेळाडूंना किटचे वाटप

श्रीगोंदा : इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे आयोजित राज्यस्तरीय ऍथलेटिक्स स्पर्धा पुणे येथील समर्थ सणस मैदानावर उत्साहात पार पडली. या स्पर्धेत परिक्रमा पॉलिटेक्निकच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत महाविद्यालयाचा लौकिक उंचावला.
या स्पर्धेत परिक्रमा तंत्रनिकेतनचे वैष्णवी शेंडगे, अविनाश गावडे आणि अनुराधा धुमाळ असे एकूण तीन खेळाडू सहभागी झाले होते. मुलींच्या गटात वैष्णवी शेंडगे हिने २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत उत्कृष्ट कामगिरी करत राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या स्पर्धेत इतर खेळाडूंनीही उल्लेखनीय कामगिरी केली.
या यशाबद्दल परिक्रमा शैक्षणिक संकुलाचे संस्थापक तथा माजी मंत्री बबनराव पाचपुते, अध्यक्षा डॉ.  प्रतिभा पाचपुते, सचिव आमदार विक्रमसिंह पाचपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी ऍड. प्रतापसिंह पाचपुते, ऍकॅडमी डायरेक्टर इंद्रायणी पाचपुते, मुख्य अतिरिक्त कार्यकारी अधिकारी प्रा. अनिल पुंड, अतिरिक्त ऍकॅडमी डायरेक्टर संजीव कदम-पाटील, तंत्रनिकेतन प्राचार्य डॉ. प्रशांत सूर्यवंशी, इंजिनिअरिंग प्राचार्य मोहन धगाटे, एमबीए डायरेक्टर डॉ. सुदर्शन गिरमकर, फार्मसी प्राचार्य डॉ. सुनील निर्मळ तसेच सायन्स कॉलेज प्राचार्य डॉ. पांडुरंग इथापे यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या खेळाडूंना तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. प्रशांत सूर्यवंशी आणि शारीरिक शिक्षण संचालक प्रा. अशोक राहिंज यांचे मार्गदर्शन लाभले.

COMMENTS