Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भूमिपूजनासाठी कोल्हेंकडून दमबाजी : कदम

कोपरगाव : शहरातील सुभद्रानगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिर, सभामंडप व परिसर सुशोभीकरण कामासाठी आ.आशुतोष काळे यांनी निधी दिला असताना भूमिपूजन आपल्

मेहत्रे यांना ७ मेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश; कर्जत नगरपंचायतीत सत्तासंघर्ष तीव्र
भाजपलाच मतदान करा; निधी कमी पडू देणार नाही : आ. मोनिका राजळे; माळीबाभुळगावात तीन कोटींच्या विकासकामांचा प्रारंभ
जामखेडमधील अतिक्रमण, महामार्ग प्रश्नावर प्रशासन अलर्ट; सभापती राम शिंदे यांनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांसह बैठक

कोपरगाव : शहरातील सुभद्रानगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिर, सभामंडप व परिसर सुशोभीकरण कामासाठी आ.आशुतोष काळे यांनी निधी दिला असताना भूमिपूजन आपल्याच हातून व्हावे यासाठी  कोल्हे  कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांनी नागरिकांना दमबाजी केली. यापुढेही असाच सत्तेचा उतमात सुरु राहिल्यास कोपरगावकर आणि स्वामी समर्थ भक्त त्यांना माफ करणार नाही अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक जनार्दन कदम यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केली आहे.
 कदम यांनी म्हटले आहे की, संबंधित सुशोभीकरणासाठी आमदार आशुतोष काळे यांनी सुमारे ४० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून, कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने भूमिपूजनाचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता. मात्र या कामात कोणतेही योगदान नसताना विवेक कोल्हे यांनी भूमिपूजन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
 रविवारी (दि. १९) सुभद्रानगर येथे भूमिपूजनासाठी आले असता, ‘ज्यांचे योगदान नाही त्यांच्या हस्ते भूमिपूजन का?’ असा प्रश्न उपस्थित करत काही नागरिकांनी विरोध दर्शविला. यामुळे कार्यक्रमस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
 या वेळी भूमिपूजन करता न आल्याच्या रागातून विवेक कोल्हे यांनी नागरिकांना दमबाजी केल्याचा आरोप कदम यांनी केला आहे. या घटनेमुळे स्वामी समर्थ मंदिर परिसरातील भाविकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले.
 नगरपरिषदेची सत्ता मिळाल्यापासून नागरिकांशी दमबाजीचे प्रकार वाढत असल्याचा आरोप करत, अशीच परिस्थिती कायम राहिल्यास कोपरगावची जनता योग्य वेळी धडा शिकवेल, असा इशाराही कदम यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिला आहे.

COMMENTS