कडा : आष्टी तालुक्यातील कडा येथील वर्धमान महावीर चॅरिटेबल ट्रस्ट संचालित, सीबीएसई मान्यताप्राप्त महावीर इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी थायलंड

कडा : आष्टी तालुक्यातील कडा येथील वर्धमान महावीर चॅरिटेबल ट्रस्ट संचालित, सीबीएसई मान्यताप्राप्त महावीर इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी थायलंड (बँकॉक) येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय एअर रायफल शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचे आणि देशाचे नाव उज्ज्वल केले आहे.
या स्पर्धेत प्रणिता गायकवाड (इयत्ता सहावी), संस्कृती बोबडे (इयत्ता सहावी) आणि आरशान सय्यद (इयत्ता सातवी) या तिन्ही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रत्येकी सुवर्णपदक पटकावले. त्यांच्या या यशामुळे शाळेचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका वाजला आहे. या यशामागे क्रीडा शिक्षक अहमद पठाण आणि वैशाली शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष अमित राठोड, उपाध्यक्ष संदीप चानोदीया, सचिव हेमंत मेहेर, कोषाध्यक्ष डॉ. प्रमोद भळगट तसेच पदाधिकारी मनीष गांधी, प्रकाश श्रीश्रीमाळ, अमोल पटवा, संजय पितळे, संतोष गांधी, एअर गन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष लव कुमार, मुख्याध्यापक अभिलाष के. के., सल्लागार मेहेर सर आणि सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

COMMENTS