Homeताज्या बातम्या

कर्जत शहरातील गुंडगिरी मोडून काढाव्यापारी असोसिएशनचे पोलिसांना निवेदन

कर्जत : शहरात नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांचे कर्जत शहर व्यापारी असोसिएशनच्या वतीने स्वागत करण्यात आले. यानिमित्त आयोजित

घारगाव–पिंपळगाव पिसा रस्त्यालगत उघडी विहीरअपघाताचा धोका;  प्रशासनाने उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी
शासकीय ताफ्यात कपात; दोनच वाहनांचा वापरपंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या संदेशाला पालकमंत्र्यांचा प्रतिसाद
खा. नीलेश लंके यांची प्रकृती बिघडली


कर्जत : शहरात नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांचे कर्जत शहर व्यापारी असोसिएशनच्या वतीने स्वागत करण्यात आले. यानिमित्त आयोजित चर्चासत्रात व्यापाऱ्यांनी विविध समस्या  मांडत मागील काही दिवसांपासून काही तरुण गुंड दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे व्यापारी भयभीत झाले आहे, तरी सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात आणि गुन्हेगारांना शासन व्हावे अशी मागणी व्यापारी शिष्ट मंडळाच्या वतीने करण्यात आली.
बैठकीस कर्जत शहर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष बिबीशन खोसे, उपाध्यक्ष महावीर बोरा, सचिव प्रसाद शहा, खजिनदार संतोष भंडारी, गणेश तोरडमल, गणेश जेवरे, संदीप गदादे, उपमन्यु शिंदे, किशोर बोथरा, सुरेश नहार, पिंटू थोरात यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.
 निवेदनात म्हटले आहे की, शहरामध्ये व्यवसाय करणाऱ्या सर्व व्यापाऱ्यांना संरक्षण मिळावे, काही व्यापाऱ्यांना गावातील टोळके दुकानांमध्ये घुसून दमदाटी करत आहे त्याच्यावर निर्बंध घालावे. या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवून प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
तसेच कर्जत-राशीन मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्नही बैठकीत उपस्थित करण्यात आला. ट्रॅफिक जॅममुळे व्यापारी, ग्राहक आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी व्यापाऱ्यांच्या समस्या ऐकून घेत शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच व्यापाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

COMMENTS