Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोट्यवधींच्या शेअर मार्केट घोटाळ्याचा भांडाफोड लवकरच होणार

फलटण / प्रतिनिधी : संपुर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यात पसरलेला कोट्यवधींची गुंतवणूक असलेल्या बोगस शेअर कंपनीचा घोटाळा लवकरच उघडा पडणार आहे. यात ब

लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपिस 10 वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा
बिबट्याच्या हल्ल्यानंतर वनविभाग तात्पुरता जागा
सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञांच्या यादीत डॉ. राजाराम माने

फलटण / प्रतिनिधी : संपुर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यात पसरलेला कोट्यवधींची गुंतवणूक असलेल्या बोगस शेअर कंपनीचा घोटाळा लवकरच उघडा पडणार आहे. यात बोगस कंपनीसह फलटण तालुक्यासह इतर जिल्ह्यातील एजंट व गुंतवणूकदारांची चौकशी येणार्‍या काही दिवसात होणार असल्याची माहिती मिळत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मागील दोन वर्षात अनेक लोकांना कोरोना महामारीचा मोठा फटका बसला आहे. अशा लोकांची आर्थिक गरज लक्षात घेऊन त्यांना पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवले जात आहे. राज्यासह फलटण तालुक्यात विविध भागात विविध प्रलोभने देऊन पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून एका बोगस कंपनीने फलटण तालुक्यातील काही एजंट लोकांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणावर कमिशन देऊन कोट्यवधी रकमेची आर्थिक लूट करत मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य लोकांची फसवणूक झाली आहे.
पैसे दुप्पट होतील या अपेक्षेने व्यापारी, शासकीय अधिकारी व कर्मचारी, महिला वर्ग लोक पैसे गुंतवण्यासाठी पुढे येतात. त्याचा गैरफायदा घेऊन लोकांना लुटले जात आहे. शेअर मार्केटच्या नावाखाली पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवले जाते व लोकांना लुटले जाते. यासाठी बोगस कंपन्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या बोगस कंपनीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये हडपून कंपन्यांचे संचालक मालामाल झाले आहेत.

COMMENTS