Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात अवकाळी पावसाची हजेरी; उकाड्यातून दिलासा, तापमानात घट

पुणे : शहरात सोमवारी दुपारच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली असून नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. औंध, बाणेर, पाषाण आणि शि

पारनेरमध्ये वादळ अन् गारपिटीने जनजीवन विस्कळीत; पत्रे उडाले; गोठ्यांची पडझड; गारांनी झोडपले; शेतीचे नुकसान
राज्यावर पुढील चार दिवस अस्मानी संकट; अनेक जिल्ह्यांत गारपीट व वादळी पावसाचा इशारा
उत्तर प्रदेश-बिहारमध्ये अवकाळीमुळे ४८ जणांचा मृत्यू; देशात मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज

पुणे : शहरात सोमवारी दुपारच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली असून नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. औंध, बाणेर, पाषाण आणि शिवाजीनगर या भागांत हलक्या सरी कोसळल्या, तर इतर भागांत ऊन आणि ढगाळ वातावरणाचा खेळ सुरूच असल्याचे दिसून आले.
सकाळपासूनच आकाश ढगाळलेले होते. दुपारी सुमारे दोनच्या सुमारास काही भागांत पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून तापमानात किंचित घट झाली आहे. त्यामुळे उष्णतेने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. हवामान विभागाने यापूर्वीच राज्यातील काही भागांत ढगाळ वातावरण राहील तसेच हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्या अंदाजानुसार पुण्यात पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, 30 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत राज्याच्या हवामानात लक्षणीय बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. खानदेश, मराठवाडा, पश्‍चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात दुपारनंतर मेघगर्जनेसह पाऊस, ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगाने वारे आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

COMMENTS