Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खा.शरद पवार पुन्हा मैदानात

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पुन्हा सक्षमपणे उभा करण्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी नव्या जोमाने मैदानात उतरण्

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त मुंबई निळ्या प्रकाशाने उजळून निघाला!
दहावीचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल ९२.०९ टक्के, यंदाही मुलींनीच मारली बाजी!
आशा स्वयंसेविका व कंत्राटी कर्मचार्‍यांनाराज्य विमा योजना लागू करण्याचा प्रस्ताव सादर करासार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पुन्हा सक्षमपणे उभा करण्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी नव्या जोमाने मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर ते पुन्हा सक्रिय होत असून, लवकरच राज्यव्यापी संपर्क दौर्‍याला प्रारंभ करणार असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.
आरोग्याच्या कारणास्तव काही काळ सार्वजनिक जीवनापासून दूर राहिल्यानंतर पवार आता पूर्णपणे कार्यरत होण्यासाठी सज्ज झाले आहेत. येत्या दोन आठवड्यांत हा दौरा सुरू होण्याची शक्यता असून, पक्ष संघटनेला नवसंजीवनी देणे आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असेल. अलीकडे झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. सत्ताधारी गटासह इतर पक्षांकडून तीव्र स्पर्धेला सामोरे जावे लागल्याने संघटनात्मक ताकद वाढवण्याची गरज प्रकर्षाने जाणवू लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर तळागाळापासून पक्षाची नव्याने उभारणी करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. याच अनुषंगाने 31 मार्च ते 2 एप्रिलदरम्यान मुंबईत जिल्हानिहाय संघटनात्मक बैठका पार पडणार असून, प्रत्येक जिल्ह्यातील राजकीय स्थितीचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीत आगामी धोरणे, निवडणूक तयारी आणि संघटन विस्तारावर सखोल चर्चा होण्याची शक्यता आहे. पक्षातील वरिष्ठ पदाधिकार्‍यांच्या मते, पवार यांची तब्येत आता स्थिर असून त्यांनी पुन्हा सक्रिय होण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यांच्या पुनरागमनामुळे कार्यकर्त्यांमध्ये नव्या उत्साहाची लाट निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

COMMENTS