Homeमहाराष्ट्रमराठवाडा

मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार16 मे रोजी आंदोलनाची दिशा ठरणार

जालना : मराठा समाजाच्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा राज्यव्यापी आंदोलन उभारण्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. 16 मे रोजी आं

शरद पवारांचं विलीनीकरणावर स्पष्ट मत; राजकीय हालचालींना वेग!
नांदेड-निजामुद्दीन साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वेच्या 8 फेर्‍यांत वाढ
जालन्यात ज्वालामुखी? पाहा काय आहे जमिनीतून निघालेल्या काळ्या ज्वलनशील पदार्थाचे सत्य!
मराठा आंदोलक मनोज जरांगे आरक्षणासाठी पुन्हा मैदानात, आत्तापर्यंत किती वेळा  उपोषण ? - Marathi News | Manoj jarange patil hunger strike till date for  maratha reservation | TV9 Marathi


जालना : मराठा समाजाच्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा राज्यव्यापी आंदोलन उभारण्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. 16 मे रोजी आंतरवाली सराटी येथे होणार्‍या बैठकीत पुढील आंदोलनाची घोषणा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारवर टीका करताना, केवळ विनंती करून न्याय मिळणार नसून आता आक्रमक भूमिका घ्यावी लागेल, असेही त्यांनी म्हटले.
पत्रकारांशी संवाद साधताना जरांगे म्हणाले की, मराठा समाजाने एकजुटीने उभे राहण्याची गरज आहे. सरकारकडे कितीही विनवण्या केल्या किंवा भावना व्यक्त केल्या तरी समाजाच्या प्रश्‍नांकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे आता कठोर आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्याशिवाय न्याय मिळणार नाही, असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, आंदोलन करताना कोणत्याही राजकीय पक्षाबद्दल मवाळ भूमिका घेऊन चालणार नाही. समाजाच्या हक्कांसाठी ठाम आणि कट्टर भूमिका घ्यावी लागेल. अन्यथा मराठा समाजाच्या मागण्या पुन्हा दुर्लक्षित राहतील, असा इशाराही त्यांनी दिला. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना व्याज परतावा वेळेत मिळत नसल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे अनेक मराठा तरुण उद्योजक आर्थिक अडचणीत सापडल्याचा दावा त्यांनी केला. या प्रश्‍नावर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. 16 मे रोजी आंतरवाली सराटी येथे मोठी बैठक आयोजित करण्यात आली असून, याच बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा आणि तारीख जाहीर केली जाणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले.

COMMENTS