पाथर्डी तालुक्यातील चोरी सत्र थांबेना ; मोहटे येथे दिवसा पाच लाख सहा हजारांची चोरी…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाथर्डी तालुक्यातील चोरी सत्र थांबेना ; मोहटे येथे दिवसा पाच लाख सहा हजारांची चोरी…

अभिजित खंडागळे/पाथर्डी : तालुक्यातील मोहटे पाऊतकावस्ती येथील अंबादास अश्रू दहिफळे यांच्या राहत्या घरांच्याकडी कोंड्याचे कुलूप तोडून बुधवारी दुपारी अज

भय इथले संपत नाही… एकाच दिवसात सापडले बाराशेवर रुग्ण, लॉकडाऊनची चिन्हे वाढली
चापोरा किल्ला
मस्जिदीत नमाज पठणावर रमजान काळात बंदी

अभिजित खंडागळे/पाथर्डी : तालुक्यातील मोहटे पाऊतकावस्ती येथील अंबादास अश्रू दहिफळे यांच्या राहत्या घरांच्या
कडी कोंड्याचे कुलूप तोडून बुधवारी दुपारी अज्ञात चोरट्यांने अडीच लाख रोख रक्कम आणि सोने असा एकूण ५ लाख सहा हजाराचा मुद्देमाल चोरून नेला असून पाथर्डी पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की,अश्रू दहिफळे त्यांच्या कुटूंबासह मोहटे येथील पाऊतकावस्तीवर एकत्र राहतात.बुधवारी सकाळी आठच्या सुमारास ते व घरातील सगळे जवळच असलेल्या जमिनीत कामाला गेले होते.त्यानंतर त्याचा नातू हा बारा वाजण्याच्या सुमारास शाळेतून येत.घरी जेवण केल्यानंतर घराला व्यवस्थित कुलूप लावून बंद केले.आणि त्याच्या कामाच्या ठिकाणी गेला.त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास दहिफळे यांचा मुलगा व नातू हे घरी आल्यानंतर त्यांना सदरील प्रकार लक्षात आला.एक महिन्यापूर्वी त्यांच्या गावातील एक जमीन खरेदी करण्याचे ठरले होते.त्याची खरेदी गुरुवारी करायची होती.चोरट्याने त्याच्याकडे असलेली अडीच लाखाची रोख रक्कम आणि ४ तोळे सोन्याच्या दोन अंगठ्या,२ तोळे वजनाची चैन,१ तोळा वजनाची बोरमाळ,५ग्रॅम वजनाची नथ,१०.२५ तोळे वजनाचे मंगळसूत्र असे २ लाख छप्पन हजार रुपयांचे सोने अशा एकूण पाच लाख ६ हजार रुपयांच्या मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे.घटनास्थळी श्वानपथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते.सदरील चोरीचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रणशेवरे करत आहेत.

तालुक्यातील वाढत्या चोरीच्या घटनांबाबत आमदार मोनिका राजळें यांनी सात दिवसांपूर्वी पोलिसांना निवेदन देत,आठ दिवसांत तालुक्यात पोलिसांचा वचक व अस्तित्व दिसून आले नाही.तर भाजपाच्या वतीने पोलिसांविरुद्ध तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल अशा इशारा देण्यात आला होता.परंतु त्यानंतरही तालुक्यात चोरीचे सत्र काही थांबेना.

COMMENTS