गेवराई: "माझ्या वाढदिवसासाठी हार-तुरे घेऊन मुंबईला येऊ नका, तर सामाजिक उपक्रम राबवून समाजासाठी काहीतरी चांगले कार्य करा," या भारतीय जनता पार्टीच्

गेवराई: “माझ्या वाढदिवसासाठी हार-तुरे घेऊन मुंबईला येऊ नका, तर सामाजिक उपक्रम राबवून समाजासाठी काहीतरी चांगले कार्य करा,” या भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव माननीय नामदार पंकजाताई मुंडे यांच्या आवाहनाला गेवराई तालुक्यातील कार्यकर्त्यांनी सामाजिक कृतीतून प्रतिसाद दिला आहे. ताईसाहेबांच्या या आवाहनाला शिरसावंद्य मानत युवा नेते बाळासाहेब सानप यांच्या वतीने आणि भाजप युवा नेते यशराज पंडित यांच्या अध्यक्षतेखाली गेवराई तालुक्यातील जव्हारवाडी येथे शालेय विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप करून आदर्श वाढदिवस साजरा करण्यात आला.
मादळमोही परिसरातील शाळांमध्ये एकूण १००१ दप्तरांचे वाटप करण्याचा संकल्प युवा नेते बाळासाहेब सानप यांच्या वतीने करण्यात आला आहे. या कौतुकास्पद उपक्रमाची सुरुवात जव्हारवाडी येथून करण्यात आली. येणाऱ्या दिवसांत परिसरातील विविध शाळांमध्ये जाऊन हा समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
जव्हारवाडी येथील दप्तर वाटप कार्यक्रमाप्रसंगी एजाज भाई मेंबर, संदीप आंधळे, सुशील भोपळे, भीमराव तात्या जाधव, हाजी भाई कुरेशी, वसीम सरकार या प्रमुख नेत्यांसह गावातील युवक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सरपंच, उपसरपंच, शिक्षकवृंद आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वांनी एकदिलाने सहभाग नोंदवत पंकजाताईंच्या विचारांप्रती असलेली निष्ठा आणि समाजसेवेची भावना कृतीतून दाखवून दिली. “ताईसाहेबांचा आदेश म्हणजे आमच्यासाठी केवळ शब्द नव्हेत, तर तोच आमचा संस्कार, प्रेरणा आणि जनसेवेचा मार्ग आहे. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य आणि समाजासाठी काहीतरी चांगले करण्याचे समाधान हीच ताईसाहेबांना वाढदिवसानिमित्त दिलेली खरी भेट आहे,” अशा भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. उपस्थितांनी आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करून पंकजाताई मुंडे यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अखंड जनसेवेचे बळ लाभो, अशा मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

COMMENTS