Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात आजपासून दोन दिवस पावसाची शक्यता

पुणे : राज्यात उष्णतेचा कडाका वाढत असतानाच आता मान्सूनपूर्व पावसाची चिन्हे दिसू लागली आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण वगळता उर्वरित राज

उन्हाळी गर्दी कमी करण्यासाठी नांदेड-आसनसोल दरम्यान विशेष गाडी
अकोल्याचा पारा ४७ अंशांच्या उंबरठ्यावर; विदर्भात उष्णतेचा हाहाकार, नागपूर-लातूरमध्ये दोघांचा बळी
वादळी वाऱ्यासह  मुसळधारचा इशाराराज्यातील २८ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट; सतर्कतेचा इशारा
Maharashtra Weather Update | राज्यात पुढील २ दिवस पावसाचे, यलो अलर्ट जाहीर  | Rain Forecast Marathwada Vidarbha

पुणे : राज्यात उष्णतेचा कडाका वाढत असतानाच आता मान्सूनपूर्व पावसाची चिन्हे दिसू लागली आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण वगळता उर्वरित राज्यात आज बुधवारपासून 6 ते 7 मेदरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः विदर्भात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता असून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात दोन दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
कोकण पट्ट्यात मात्र पावसाची शक्यता कमी असून उष्णतेची लाट कायम राहणार आहे. त्यामुळे किनारपट्टी भागात नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, विदर्भात पुढील तीन दिवस पावसाचा प्रभाव जाणवेल, तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात दोन दिवस वातावरणात बदल दिसून येईल. या पावसामुळे तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील तापमानाचा आढावा घेतला असता, ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक 44.2 अंश तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल अकोला येथे 43.2 अंश आणि जळगाव येथे 42.6 अंश तापमान नोंदवण्यात आले. मराठवाड्यातील बीड येथे 41.0 अंश तर सोलापूर येथे 40.8 अंश तापमान होते. धाराशिवमध्ये 40.0 अंश, अहिल्यानगरमध्ये 39.9 अंश आणि छत्रपती संभाजीनगर येथे 39.3 अंश तापमानाची नोंद झाली.

COMMENTS