Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला ?

मुंबई प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतल्या सर्वच पक्षांनी कंबर कसलीय. उमेदवार जाहीर झाले नसले तरी राज्यभरात प्रचार

स्कूल बसच्या चाकाखाली सापडून चिमुकल्याचा मृत्यू | LOK News 24
अल्पसंख्याक उमेदवारांना निवासी पोलीस शिपाई भरतीपूर्व परीक्षा प्रशिक्षण देणार
विनयभंग, अ‍ॅट्रॉसिटी गुन्ह्यातुन आरोपींची निर्दोष मुक्तता

मुंबई प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतल्या सर्वच पक्षांनी कंबर कसलीय. उमेदवार जाहीर झाले नसले तरी राज्यभरात प्रचार दौरे सुरु करण्यात आलेत.  मात्र महायुती आणि महाविकास आघाडीसाठी जागावाटपचा मुद्दा कळीचा ठरतोय. 48 लोकसभा जागांवर कोण कुठून लढणार याची वाटणी अजून झालेली नाही. अशात महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचं बोललं जातंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्यात जागावाटपा संदर्भात रात्री 35 मिनिटं बैठक पार पडली.  सह्याद्री अतिगृहावर ही बैठक पार पडली.

या बैठकीत महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सुत्राकडून मिळतेय. भाजप-28, शिंदे गट-16 आणि अजित पवार गट 4 जागा लढणार असं सुत्रांकडून समजतंय. त्यामुळे महायुतीच्या जागावाटप फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. मात्र या बैठकीतह काही जागांचा तिढा सुटलेला नाही. 13 जागांचा तिढा अजूनही कायम आहे.. दरम्यान 400 प्लसचं टार्गेट डोळ्यासमोर ठेवून राज्यात महायुती म्हणून कामाला लागा. अशा सूचना अमित शाहांनी महायुतीच्या नेत्यांना दिल्या आहेत. जागावाटपावर जास्त चर्चा करत न बसता आपलं मिशन मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे हे डोळ्यासमोर ठेवा अशा सूचना शाहांनी दिल्या. 

COMMENTS