Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

थापा मारणारा विचित्र बघितला नाही : आ. नाईक-निंबाळकर

फलटण / प्रतिनिधी : आमदाराचे पिए झाले खासदार हे काय राजकारण त्यांचे चाललंय हे त्यांनाच माहीत आपल्या तालुक्याला न शोभणारी संस्कृती आहे. निरा-देवधर

एकरकमी एफआरपीसाठी कारखान्यावर मोटसायकल रॅली
हनुमान चालीसासह भोंग्यांची भाषेमुळे समाजात तेढ निर्माण : ना. जयंत पाटील
समाजकल्याण विभागातर्फे तृतीयपंथीयांसाठी आज सातार्‍यात मेळावा

फलटण / प्रतिनिधी : आमदाराचे पिए झाले खासदार हे काय राजकारण त्यांचे चाललंय हे त्यांनाच माहीत आपल्या तालुक्याला न शोभणारी संस्कृती आहे. निरा-देवधर धरणासाठी 3900 कोटी रुपयाची तरतूद झाली असे सागितले. पण निरा- देवघरचे काम राहीले 2000 कोटीचे राहिलेल्या 1900 कोटीचा नवीन कारखाना निघणार आहे काय? थापा किती मारायच्या इतका विचित्र माणूसच मी बघितला नाही, असा आरोप श्रीमंत रामराजे यांनी खासदार रणजितसिंह यांच्यावर केला.
महाराष्ट्र विधान परिषद माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वाठार निंबाळकर, ता. फलटण येथे स्वप्नशिला मंगल कार्यालयात भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी आ. दिपकराव चव्हाण, सातारा जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरुपराजे निंबाळकर खर्डेकर, महानंदाचे माजी व्हा. चेअरमन व विद्यमान संचालक डी. के. पवार, फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघाचे चेअरमन धनंजय पवार, पै. गोरख सरक, माजी सभापती रामभाऊ ढेकळे व मोहनराव लोखंडे, दीपकराव गोडसे, मोहनराव निंबाळकर, विवेक शिंदे, रामदास कदम, सुरेश रोमण, श्रीरंग चव्हाण, अभिजीत निंबाळकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले , मला त्याचं नाव ही घ्यावस वाटत नाही. दुर्दैवाने आमचे आडनाव एक आहे. निरा-देवघर या विषयावर आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका होणार आहेत. आज सगळेजण म्हणतात पाणी मी आणले पाणी मी आणले आज जर उरमोडी धरण झाले नसत तर माण-खटावला पाणी मिळाले असते का? निरा-देवधर धरणासाठी 3900 कोटी रुपयाची तरतूद झाली असे सागितले. पण निरा-देवघरचे काम राहीले 2000 कोटीचे. राहिलेल्या 1900 कोटीचा नवीन कारखाना निघणार आहे काय? थापा किती मारायच्या इतका विचित्र माणूसच मी बघितला नाही असा आरोप श्रीमंत रामराजे यांनी खासदार रणजितसिंह यांच्यावर केला.
ही जी झाली आहे ती निरा देवघर ची सुधारित प्रशासकीय मान्यता आहे. रेल्वे टेस्टिंग झाल्यानंतर परत पळालेली मी बघितलेली नाही तुमचे आम्हाला 120 कोटी काय करायचे. धोम बलकवडीला 0.92 टीएमसी पाणी वाचवायची रचना माझी आणि हे म्हणतात माझी तुम्ही म्हणताय मी भागीरथ ते म्हणतात ते भागीरथ. डोकं आमचं पाणी आणल आम्ही पण आम्हाला सुचलं नाही कारखाना काढायचं. पाणी आमचं आणि ऊस त्यांचा आणि त्या ऊसाला दर मिळत नाही, कामगाराला पगार मिळत नाही. या माणसाला नीरा नदी कुठ आहे माहिती आहे का? भाटघर धरण कुठल्या नदीवर आहे हे माहिती आहे का? खासदार आहात तुम्ही खासदार सारखे वागा. पार्लमेंटमध्ये काहीतरी बोला, हिम्मत असेल तर तुम्ही नवीन काहीतरी करून दाखवा. मला राज्यात कुणाचे शत्रुत्व नाही. बीजेपीतही माझ्याबद्दल प्रेमाने बोलणारे आहेत. काँगेसमध्ये आहेत, आपण कोणाशी भांडण काढलीच नाहीत. करतो सगळं मी पण बोलतात हे, बंडलबाजी करणार्‍या माणसाच्या नादाला लागू नका, असे आवाहन रामराजे नाईक निंबाळकर यांनी उपस्थितांना केले.

COMMENTS