Homeताज्या बातम्यादेश

इराणचा युद्धविराम प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळलाअमेरिका-इराण यांच्यातील तणाव अजूनही कायम

वॉशिंग्टन : अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढला असून युद्धविरामासंदर्भातील इराणचा प्रस्ताव अमेरिकेने नाकारला आहे. पाकिस्तानमार्फत

मध्यपूर्वेत युद्धाची नांदी !
महासत्तांना जागतिक संतुलन बनवावे लागेल; अन्यथा…!
फ्रान्सवर 200 टक्के आयातकर लादण्याचा ट्रम्प यांचा इशारा


वॉशिंग्टन : अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढला असून युद्धविरामासंदर्भातील इराणचा प्रस्ताव अमेरिकेने नाकारला आहे. पाकिस्तानमार्फत पाठवण्यात आलेल्या या प्रस्तावाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पूर्णपणे अस्वीकार्य ठरवत फेटाळून लावले. मात्र, प्रस्तावातील कोणत्या मुद्द्यांवर आक्षेप आहे, याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली नाही.
इराणने केवळ तात्पुरता नव्हे तर कायमस्वरूपी युद्धविरामाची मागणी केली आहे. संघर्षाचा परिणाम फक्त इराणपुरता मर्यादित न राहता लेबनॉनसह संपूर्ण पश्‍चिम आशियात शांतता प्रस्थापित व्हावी, अशी तेहरानची भूमिका आहे. तसेच समुद्री व्यापारमार्ग आणि तेलवाहतुकीच्या सुरक्षेची हमी देण्याची मागणीही इराणकडून करण्यात आली आहे. अमेरिकेच्या प्रस्तावात युद्ध थांबवणे, सामरिकदृष्ट्या महत्त्वाची होर्मुज सामुद्रधुनी पुन्हा खुली करणे आणि इराणच्या अणुकार्यक्रमावर निर्बंध आणणे या अटींचा समावेश होता. जगातील मोठ्या प्रमाणातील तेल व वायू वाहतुकीसाठी होर्मुज सामुद्रधुनी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ट्रम्प यांनी समाजमाध्यमांवर इराणवर टीका करताना तेहरानने अनेक वर्षे अमेरिकेला फसवण्याचा प्रयत्न केला, मात्र आता ते सहन केले जाणार नाही, असे म्हटले. संयुक्त राष्ट्रांतील अमेरिकेचे प्रतिनिधी माइक वॉल्ट्झ यांनी सांगितले की, युद्ध पुन्हा भडकू नये म्हणून अमेरिका राजनैतिक प्रयत्नांना संधी देण्याच्या भूमिकेत आहे. दुसरीकडे, इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांनी लष्कराच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत बैठक घेत कठोर आणि निर्णायक कारवाई सुरू ठेवण्याचे निर्देश दिल्याची माहिती सरकारी माध्यमांनी दिली. खाडी परिसरातील ड्रोन हल्ल्यांमुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. कतारजवळ एका जहाजाला ड्रोन हल्ल्यात आग लागली, तर संयुक्त अरब अमिराती आणि कुवेतने त्यांच्या हवाई हद्दीत संशयास्पद ड्रोन आढळल्याचे सांगितले. संयुक्त अरब अमिरातीने दोन ड्रोन पाडल्याचा दावा करत त्यासाठी इराणला जबाबदार धरले आहे. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
कतारने जहाजावरील हल्ला अत्यंत धोकादायक असल्याचे सांगत समुद्री व्यापार आणि आवश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली. कुवेतच्या लष्करानेही ड्रोन हालचालींची पुष्टी केली, मात्र त्यांचा उगम स्पष्ट केला नाही. युद्धकाळात इराण आणि त्याच्या सहयोगी हिजबुल्ला संघटनेकडून सातत्याने ड्रोन हल्ले होत असल्याचे सांगितले जात आहे.
इराणकडून ट्रम्प यांच्या भूमिकेचे समर्थन
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या माहितीनुसार, इराणकडे सुमारे 440 किलोपेक्षा अधिक, 60 टक्क्यांपर्यंत समृद्ध केलेले युरेनियम साठवलेले आहे. हा साठा अण्वस्त्रनिर्मितीच्या क्षमतेच्या जवळ मानला जातो. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी, इराणमधून समृद्ध युरेनियम हटवले जात नाही तोपर्यंत युद्ध पूर्णपणे संपल्याचे मानता येणार नाही, असे म्हटले आहे. त्यांनी ट्रम्पही या भूमिकेच्या समर्थनात असल्याचा दावा केला.

COMMENTS