Homeताज्या बातम्याअन्य जिल्हे

महात्मा फुले द्विशताब्दी जयंतीनिमित्तविशेष चित्ररथाचे महाराष्ट्रभर होणार भ्रमण

अमरावती : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त राज्यभर विविध सामाजिक, शैक्षणिक आणि जनजागृतीपर उपक्रम राबवले

किरकोळ वादातून परप्रांतीयाची वृद्धाला बेदम मारहाण
ज्येष्ठ गीतकार जहीर आलम यांचे निधन
गणपतीपुळे समुद्रकिनार्‍यावर पाच जण बुडाले


अमरावती : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त राज्यभर विविध सामाजिक, शैक्षणिक आणि जनजागृतीपर उपक्रम राबवले जात आहेत. या उपक्रमांच्या माध्यमातून महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने विशेष चित्ररथ महाराष्ट्रभर फिरविण्यात येत आहे.
समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली माजी खासदार डराशशी इर्हीक्षलरश्र आणि आमदार झरपज्ञरक्ष इर्हीक्षलरश्र यांच्या संकल्पनेतून हा चित्ररथ साकारण्यात आला आहे. 11 एप्रिल 2026 ते 10 एप्रिल 2027 या कालावधीत हा चित्ररथ राज्यातील विविध गावांमध्ये आणि शहरांमध्ये फिरून समाजप्रबोधनाचे कार्य करणार आहे.
चित्ररथामध्ये महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे प्रभावी दर्शन घडविण्यात आले आहे. महात्मा फुले यांचा पूर्णाकृती पुतळा, ज्ञानाचे प्रतीक म्हणून पुस्तके आणि लेखणी यांची आकर्षक मांडणी करण्यात आली आहे. तसेच पुण्यातील ऐतिहासिक भिडे वाड्याची प्रतिकृतीही चित्ररथात उभारण्यात आली असून ती विशेष आकर्षण ठरत आहे. समता, बंधुता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणारा हा चित्ररथ ज्या ठिकाणी पोहोचतो, त्या ठिकाणी महामानवांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येते. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, जनजागृती उपक्रम आणि सामाजिक ऐक्याचा संदेश यांमुळे नागरिकांकडून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. समता परिषदेचे अमरावती जिल्हाध्यक्ष नंदकिशोर लेकुरवाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा चित्ररथ अमरावती जिल्ह्यात 18 आणि 19 मे रोजी भ्रमण करणार आहे. या निमित्ताने जिल्हा, महानगर आणि तालुका पदाधिकार्‍यांनी चित्ररथाचे उत्साहात स्वागत करावे, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर आधारित पोवाडे, रांगोळी स्पर्धा, लेझीम आणि ढोल पथकांसह स्वागत मिरवणुका आयोजित कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS