Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीड जिल्हाभूमि अभिलेख अधिक्षक शिंदे साहेबाची केज तालुक्यावर वक्रदृष्टी केजचे उप अधिक्षक पद रिक्तच

केज प्रतिनिधी - केज येथील भूमि अभिलेख उप अधिक्षक पद मे महिण्यापासून रिक्त आहे याकडे कोणत्याही लोकप्रतिनिधी व नेत्यांचे लक्ष नाही जनतेचे कामकाज ठ

’मविआ’ ची दलाली आणि कमिशन खोरी मोडीत काढली
दिल्ली पोलिसांची दमनशाही
प्रदर्शनाच्या आधी सुभेदार चित्रपटाचा रेकॉर्ड

केज प्रतिनिधी – केज येथील भूमि अभिलेख उप अधिक्षक पद मे महिण्यापासून रिक्त आहे याकडे कोणत्याही लोकप्रतिनिधी व नेत्यांचे लक्ष नाही जनतेचे कामकाज ठप्प झाले आहे.महाराष्ट्रात दिनांक 22 मे 2023 रोजी भूमिअभिलेख कार्यालया तील अधिकारी व कर्मचारी यांच्या बदल्या झाल्या तेव्हा पासून केज चा पदभार अंबाजोगाईचे भूमि अभिलेख उप अधिक्षक संधान साहेबां कडे होता बदलीनंतर मे, जून,जूलै या तीन महीण्याचा पदभार पाटोदा येथील भूमि अभिलेख चे उपअधिक्षक गायकवाड साहेबांकडे वर्ग केला पण जिल्हा भूमि अभिलेख अधिक्षक शिंदे साहेबांनी गायकवाड साहेबांकडे डि.एस.सी. अजून दिलेली नाही.
केज तालूक्यातील तीन महिन्याच्या कालावधी मध्ये केज तालुक्यासह शहरातील शेकडो प्रकरणे थांबली आहेत.आज अंबाजोगाई,परळी ,धारूरचे पदभार भूमिअभिलेख कार्यालयाचे सहायक यांच्याकडे पदभार देऊन सर्व कामकाज व्यवस्थित चालू आहे मग केज बाबत शिंदे साहेबांना कोणाचा वचक किंवा विचारणा करणार नाहीत अश्या अर्विभावात आहेत.लोकप्रतिनिधी व सर्व पक्षाचे नेतेमंडळीने याकडे लक्ष देऊन भूमिअभिलेख उपअधिक्षक पद लवकरात लवकर भरावे अशी मागणी केज तालुक्यासह शहरातील नागरिकांतून केली जात आहे.

COMMENTS