Homeताज्या बातम्या

वसंतदादा पाटील विद्यालयात लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

श्रीगोंदा: श्रीगोंदा तालुक्यातील पिंपरी कोलंदर येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील विद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लो

अकोले नगराध्यक्षपदासाठी ३१ जुलैला निवडणूक; अविश्वास ठरावानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून कार्यक्रम जाहीर
स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांची दमदार कामगिरी! जबरी चोरी, घरफोडी, सोलार प्लांटवर चोरी करणारी टोळी केली जेरबंद
नीट पेपरफुटी प्रकरणाचे देशभरात पडसाद! सर्वोच्च न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी

श्रीगोंदा: श्रीगोंदा तालुक्यातील पिंपरी कोलंदर येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील विद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक नवनाथ पवार होते. प्रारंभी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.

यावेळी विद्यालयाचे शिक्षक शिवाजी इथापे यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यिक कार्याचा, सामाजिक परिवर्तनातील योगदानाचा तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा सविस्तर आढावा घेतला. त्यांच्या साहित्याने समाजातील वंचित, शोषित घटकांना आवाज दिला आणि मोठी सामाजिक जागृती घडवून आणली, असे त्यांनी मनोगतात सांगितले.

इतिहास विषयाचे शिक्षक बाबासाहेब लष्करे यांनी लोकमान्य टिळक यांच्या भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अतुलनीय योगदानावर प्रकाश टाकला. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” हा टिळकांचा प्रेरणादायी संदेश आजही युवकांसाठी मार्गदर्शक असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाला स्कूल कमिटीचे सदस्य आबासाहेब ओहोळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना दोन्ही महापुरुषांच्या विचारांचा आदर्श जीवनात अंगीकारण्याचे आवाहन केले. तसेच या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या वकृत्व स्पर्धेतील विजेत्यांसाठी बक्षिसांची घोषणा केली. विद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांसाठी मुख्याध्यापक व शिक्षकांच्या प्रयत्नांचे त्यांनी विशेष कौतुक केले.

कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन अमोल कुताळ यांनी केले, तर पारधी यांनी उपस्थितांचे आभार मानले. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या मोठ्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

COMMENTS