Homeताज्या बातम्या

अकोले नगराध्यक्षपदासाठी ३१ जुलैला निवडणूक; अविश्वास ठरावानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून कार्यक्रम जाहीर

अकोले: अकोले नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, शुक्रवार, ३१ जुलै रोजी सकाळी ११ वाजता नगरपंचायत सभागृहात विशे

पश्चिम बंगालमध्ये समान नागरी कायदा लागू होणार; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची मोठी घोषणा
अहिल्यानगर-मनमाड महामार्गावरील मृत्यूंची उच्च न्यायालयाकडून दखल
TET पेपरफुटीवरून मुंबईत उग्र आंदोलन; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची युवक काँग्रेसची मागणी
Build gutters on Shahapur-Gevrai road before monsoon, demand of Mayor  Sonali Naikwadi | Marathi News

अकोले: अकोले नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, शुक्रवार, ३१ जुलै रोजी सकाळी ११ वाजता नगरपंचायत सभागृहात विशेष सभेत नव्या नगराध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. प्रांताधिकारी तथा पीठासीन अधिकारी अरुण उंडे यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडणार आहे.

विद्यमान नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर १३ जुलै रोजी झालेल्या विशेष सभेत मतदान झाले होते. या वेळी एकूण १७ सदस्यांपैकी १२ सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने दोन-तृतीयांश बहुमताने अविश्वास ठराव मंजूर झाला होता. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि पाच सदस्य या बैठकीस अनुपस्थित होते. या घडामोडींमुळे भाजपमधील अंतर्गत मतभेद उघड झाले असून, नगराध्यक्ष वडजे यांना पद गमवावे लागले.

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार २७ जुलै रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्याच दिवशी दुपारी २ वाजता अर्जांची छाननी होईल. सायंकाळी ५ वाजता अवैध उमेदवारी अर्जांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, उमेदवारी मागे घेण्याची प्रक्रिया नियमानुसार पूर्ण केली जाणार आहे.

दरम्यान, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. भाजपमधील आठ बंडखोर नगरसेवक आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे दोन नगरसेवक यांची पुढील राजकीय भूमिका काय राहणार, तसेच त्यापैकी कोण शिवसेना (शिंदे) गटात प्रवेश करणार, याकडे आता संपूर्ण अकोले शहराचे लक्ष लागले आहे.

COMMENTS