कोपरगाव: साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आमदार विवेक कोल्हे यांनी त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले. डॉ. अण्णा भ

कोपरगाव: साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आमदार विवेक कोल्हे यांनी त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले. डॉ. अण्णा भाऊ साठे स्मारक येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी उपस्थित समाज बांधवांना जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
डॉ. अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक विचारांच्या माध्यमातून वंचित, शोषित आणि उपेक्षित घटकांच्या वेदनांना आवाज दिला. त्यांच्या लेखणीतून सामाजिक समता, बंधुता आणि स्वाभिमानाचा संदेश समाजापर्यंत पोहोचला. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा आदर्श पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे आमदार विवेक कोल्हे यांनी यावेळी सांगितले. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ ऑगस्ट हा ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला असून डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे निर्माण करण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलली असल्याचेही कोल्हे म्हणाले.
याप्रसंगी माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी जगातील सर्वप्रथम स्मारक कोपरगाव येथे उभारणीसाठी केलेल्या विशेष प्रयत्नांची आठवण उपस्थितांनी काढली.
जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात आमदार विवेक कोल्हे यांनी स्वतः रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला. समाजातील प्रत्येक घटकाने सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होत गरजूंच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. रक्तदान हे श्रेष्ठ सामाजिक कार्य असून, एका व्यक्तीच्या रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात; त्यामुळे युवकांनी मोठ्या संख्येने रक्तदानासाठी पुढे यावे, असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास नगराध्यक्ष पराग संधान, उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, गटनेते प्रसाद आढाव, भाजपा तालुकाध्यक्ष विशाल गोर्डे, बबलूशेठ वाणी, दिलीप दारुणकर, विजय आढाव, राजेंद्र बागुल, संजय उदावंत, विनोद राक्षे, संतोष शिंदे, विक्रमादित्य सातभाई, कैलास मंजूळ, संदीप देवकर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS