राहाता: लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राहाता येथील काँग्रेस कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.

राहाता: लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राहाता येथील काँग्रेस कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. यावेळी महाराष्ट्राचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस कार्यालयास भेट देऊन लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मोठे योगदान असून त्यांच्या साहित्यातून समतेची क्रांती घडली असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांतून समता, सामाजिक न्याय, बंधुता आणि मानवतेचा संदेश आजही समाजाला सतत प्रेरणा देत आहे. शोषित, वंचित आणि कष्टकरी समाजाला स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा देणाऱ्या अण्णा भाऊ साठे यांचे कार्य प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचविणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून उपेक्षित वर्गाला न्याय मिळवून दिला.
अण्णा भाऊ साठे यांनी ‘फकिरा’ कादंबरीसह तब्बल ३५ कादंबऱ्यांचे लिखाण केले असून त्यांचे हे महान साहित्य विविध परदेशी भाषांमध्येही भाषांतरित झाले आहे. त्यांनी दिलेला समतेचा आणि मानवतेचा विचार आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट आहे. मात्र सध्या लोकशाही आणि राज्यघटना धोक्यात येत असून, तरुणांनी अण्णा भाऊ साठे यांचे विचार आत्मसात करून लोकशाही व राज्यघटना वाचवण्यासाठी कटिबद्ध राहावे, असे आवाहनही थोरात यांनी केले.
कार्यक्रमात उपस्थितांनी अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.
याप्रसंगी ॲड. पंकज लोंढे, उत्तमराव मते, विक्रांत दंडवते, राजेंद्र निर्मळ, बाळासाहेब खर्डे, अमोल आरणे, रमेश गागरे, संदीप कोकाटे, साहिल म्हस्के, सदाशिव गाडेकर, शिवप्रसाद आहेर, सतीश काळे, विशाल वाघमारे, बबनराव नळे, मुन्नाभाई, अमोल बनसोडे, राजेंद्र आग्रे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS