Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जि.प. पाटेगाव शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन; प्रेरणादायी उपक्रम

बीड : पाटेगाव (ता. बीड) येथील जिल्हा परिषद शाळेत सामाजिक बांधिलकी जपत एक प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते विनोद शिंगाडे यांच

नवगण राजुरी : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना उपसरपंचांसह ग्रामस्थांचे अभिवादन!
नांदेडमध्ये निळा महासागर उसळला; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अंबाजोगाईत जनप्रबोधनपर भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन- राजेश इंगोले

बीड : पाटेगाव (ता. बीड) येथील जिल्हा परिषद शाळेत सामाजिक बांधिलकी जपत एक प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते विनोद शिंगाडे यांच्या वतीने शाळेला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट देण्यात आली.
या प्रसंगी विद्यार्थ्यांना डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्याची ओळख करून देत ज्ञान, समानता आणि संविधानिक मूल्यांचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या मनोगतात विनोद शिंगाडे यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजाला दिशा देणारे आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांच्या संघर्षमय जीवनातून प्रेरणा घेऊन शिक्षणाला प्राधान्य द्यावे. मुख्याध्यापकांनी या उपक्रमाचे स्वागत करत आभार मानले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव वाढते तसेच आदर्श व्यक्तिमत्त्वांची ओळख निर्माण होण्यास मदत होते, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनीही डॉ. आंबेडकर यांच्या कार्यावर आधारित मनोगते व्यक्त केली. प्रतिमेचे पूजन करून सर्व उपस्थितांनी त्यांना अभिवादन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तसेच वैचारिक प्रगतीला चालना मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

COMMENTS