Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राठोड क्षत्रिय समाज ट्रस्टच्या अध्यक्षपदी विक्रम राठोड

नगर -    श्री सुरजबन्स राठोड क्षत्रिय समाज ट्रस्टची बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत अध्यक्षपदी विक्रम अनिलभैय्या राठोड यांची निवड कर

कुपोषण मुक्तीसाठी पोषण आहार चळवळ यशस्वी करा : मनोज ससे
घराणेशाहीची संस्थाने सत्तास्थानापासून खालसा करण्यासाठी डिच्चू कावा प्रभावी
नगरचा पाणीपुरवठा दोन दिवस विस्कळीत ; दुरुस्ती कामासाठी सहा तास उपसा बंद

नगर –    श्री सुरजबन्स राठोड क्षत्रिय समाज ट्रस्टची बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत अध्यक्षपदी विक्रम अनिलभैय्या राठोड यांची निवड करण्यात आली. तसेच कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : उपाध्यक्ष – दुर्गाप्रसाद रामप्रसाद राठोड, कंचन राठोड, सचिव – पंकज राठोड, सहसचिव निरज राठोड, खजिनदार – सौरभ राठोड, सदस्य- सुचेता परदेशी, दुर्गेश राठोड, स्वीकृत सदस्य – सोनाली राठोड, भावना राठोड, रुबी राठोड, लता राठोड, संतोष राठोड, गणेश राठोड, आश्विन राठोड, सुरज राठोड आदिंची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचा ट्रस्टच्यावतीने सत्कार करण्यात आला.

     नूतन अध्यक्ष विक्रम राठोड म्हणाले, समाजाच्या उन्नत्ती व प्रगतीसाठी ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांनी नेहमीच प्रयत्न केले आहे. त्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटन करुन ते सोडविले, प्रसंगी आंदोलने, मोर्चेही काढण्यात आले. त्याचबरोबर उपक्रमातून समाजातील प्रत्येक घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये स्व.अनिलभैय्या राठोड यांचे मोठे योगदान राहिले आहे. आज सर्वांनी एकमताने माझी व इतर पदाधिकार्‍यांची निवड करुन जो विश्वास दाखविला आहे, त्या विश्वासास पात्र राहून ट्रस्टच्या लौकिकात भर घालण्याचे काम करु.  असे सांगितले.

     यावेळी सचिव पंकज राठोड यांनी ट्रस्टच्या कामकाजाविषयी माहिती दिली. तसेच भविष्यात राबविण्यात येणार्‍या उपक्रमांची रुपरेषा सांगितली. शेवटी दुर्गाप्रसाद राठोड यांनी सर्वांचे आभार मानले.

COMMENTS